Search
Close this search box.

Sunil Tatkare Chava Sanghatana Meeting In Dharashiv: छावा संघटनेचा पदाधिकारी बोलत राहिला, सुनील तटकरे ऐकत राहिले; लातूरनंतर आज धाराशिवमध्ये काय घडले?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या प्रतिनिधींना लातूरमध्ये काल (20 जुलै) बेदम मारहाण केली. त्यानंतर आज सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करत काल झालेल्या घटनेवर दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आज धाराशिव दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि छावा संघटनेचे पदाधिकारी (Sunil Tatkare Chava Sanghatana Meeting) यांच्यात चर्चा झाली.

लातूरमध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज सुनील तटकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत. यावेळी सुनील तटकरेंची छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. काल झालेली घटना अत्यंत चुकीची आहे, असं सुनील तटकरे यांनी यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले. दरम्यान, लातूरमध्ये काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या आजच्या धाराशिव दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आले आहे. लातूरमधील घटनेचे पडसाद धाराशिवमध्येही उमटण्याची शक्यता असल्याने सूरज चव्हाणांना दौऱ्यातून वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर या राड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना तडकाफडकी बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे.

सुनील तटकरे आणि छावा संघटनेच्या पदाधिकारी यांच्यात बैठक-
सुनील तटकरे आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक पदाधिकारी म्हणाला की, काल लातूरमध्ये तुम्ही सर्व ऐकून घेतलं. मात्र त्यानंतर तुमच्याच एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने विजय घोडगे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, हे अशोभनीय आहे. आपण सत्तेत आहा, आज महाराष्ट्राची सत्ता तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे मालक नाहीय. काल झालेल्या घटनेतील संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर शेवटी संघटना म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करताय. राज्यकर्ते म्हणून शांतपणे ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा नक्की विचार करु, असं सुनील तटकरेंनी सांगितले.

माणिकराव कोकाटेंचा खुलासा चूकीचाच- सुनील तटकरे
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा खुलासा फेटाळला. माणिकराव कोकाटेंनी काल खुलासा केला तो चुकीचाच, शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्याचे वागणे चुकीचे आहे, असंही सुनील तटकरे म्हणाले. तसेच सूरज चव्हाण यांच्या कालच्या प्रकाराबद्दल देखील सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. चार ते पाचवेळा माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी चुकीची वक्तव्ये केली. एक-दोनवेळा अजित पवारांनी त्यांना समज दिली होती, अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली.

सुरज चव्हाणांची माफी, काय म्हणाले?
सदर घटनेनंतर सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे कार्यकर्ते आले होते, त्यांनी असंवैधानिक मागणी भाषेचा वापर केला आहे. त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणे सहाजिकच होते. तसेच त्यांनी त्यांच्या मागणीचं पत्र सुनिल तटकरे यांना दिले होते. तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली. पण त्यांनी तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. बाहेर जात असताना असंवैधानिक भाषेतचा वापर केला. त्यामुळं आमच्याकडून अशा प्रतिक्रिया उमटल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशास तसे उत्तर देणार असल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. अंगावर पत्ते टाकणे, असंवैधानिक भाषेचा वापर करणे हे कितपत योग्य वाटतं? सत्तेत आहोत याचा अर्त आम्ही सगळेच चूक करतो असे नाही. सत्तेत आहोत याचा अर्थ आमच्या नेतृत्वावर कोणी खालच्या पातळीवर बोलले तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असे सुरज चव्हाण म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें