Search
Close this search box.

Reliance Industries ची पहिल्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक कमाई, जिओ-रिटेलच्या मदतीनं नफा 78 टक्क्यांनी वाढला, आकडेवारी समोर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अब्जाधीश आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी कमाई केली आहे. रिलायन्सचा पहिल्या तिमाहीतील नफा 78.3 टक्क्यांनी वाढून 26,994 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. मुकेश अंबानी यांनी पेट्रोलियम व्यवसायानं देशांदर्गत मागणीची पूर्तता केल्याचं म्हटलं. तर, जिओ-बीपी नेटवर्कच्या सेवेद्वारे देखील चांगल्या प्रकारची वाढ झाल्याचं म्हटलं. इंधन आणि उत्पादनाच्या मार्जिनमध्ये देखील सुधारणा झाल्यानं चांगल्या कामगिरीला प्रोत्साहन मिळाल्याचं अंबानी म्हणाले.

कंपनीचा नफा ग्राहक व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या विक्रीच्या दमदार कामगिरीमुळं वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं शुक्रवारी शेअर बाजाराला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या आकडेवारीची माहिती दिली. एप्रिल ते जून 2025 मध्ये कंपनीनं 26994 कोटी रुपयांचा नफा मिळवला. जो प्रति शेअर 19.95 रुपये इतका राहिला. गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजनं पहिल्या तिमाहीत 15138 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजारमूल्याचा विचार केला असता देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत 39 टक्के राहिला. कंपनीनं जानेवारी- मार्च 2025 या काळात 19407 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

रिलायन्सला
जोरदार नफा
जूनच्या तिमाहीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला ग्राहकेंद्रीत व्यवसाय रिटेल आणि टेलिकॉममधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ पाहायला मिळाली. जिओ टेलिकॉमच्या ग्राहकांमध्ये वाढ झाल्यानं फायदा झाला. तर रिलायन्स रिटेलच्या स्टोअर नेटवर्कच्या वाढीनं आणि ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादानं फायदा झाला आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा ऑपरेशनल रेवेन्यू 5.26 टक्क्यांनी वाढून 2.48 लाख कोटी झाला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न 2.36 लाख कोटी रुपये होतं. कंपनीच्या माहितीनुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लिस्टेड गुंतवणुकीच्या विक्रीतून झालेली कमाई 8924 कोटी रुपये राहिली. रिलायन्स इंडस्ट्रीजनं एशियन पेंटसमधील भागीदारी विकली होती. कंपनीचा मुख्य व्यवस्या पेट्रोलिंग रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलच्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण झाल्यानं आणि कमी प्रमाणात रिफायनिंग झाल्यानं या व्यवसायात 1.5 टक्क्यांची घसरण झाली.

नव्या वर्षाची मजबूत सुरुवात
:
मुकेश
अंबानी
कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहिजीनुसार जिओ-बीपीद्वारे परिवहन इंधनाच्या देशांतर्गत विक्रीच्या वाढीनं महसूल वाढण्यात फायदा झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी म्हटलं की रिलायन्सनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये चांगली सुरुवात केली आहे. मुकेश अंबानी यांनी जगभरातील घडामोडी आणि आर्थिक क्षेत्रातील तेजी घसरण यानंतर देखील पहिल्या तिमाहीत कर पूर्व उत्पन्नात चांगली सुधारणा झाल्याचं म्हटलं.

admin
Author: admin

और पढ़ें