Search
Close this search box.

जगप्रसिद्ध टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं भारतातील पहिलं शोरुम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सुरू झालं आहे. त्यामुळे, ही बाब मराठीजनांसाठी अभिमानाची आहे.

टेस्लाचं हे देशातील पहिलं शोरुम मुंबईत सुरू झाल्याने ईव्ही क्षेत्रात हे मोठं पाऊल मानलं जात आहे. विशेष म्हणजे मुंबईत मराठी आणि हिंदी भाषेवरुन वाद सुरू असताना टेस्ला कंपनीने शोरुमच्या बाहेर ठळक अक्षरात मराठीत टेस्ला असं लिहिलं आहे.

आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि अमेरिकेन मॉडेल असलेल्या टेस्ला कंपनीने इंग्रजी आणि मराठी भाषेत कंपनीच्या शोरुमबाहेर टेस्ला असं नाव झळकावलं आहे. मुंबईतील बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे शोरुम आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज या शोरुमचं उद्घाटन झालं असून त्यांनी टेस्ला कारमध्ये बसून कारची पाहणी देखील केली. भारतात टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत, ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

‘टेस्लाचं संपूर्ण मेकॅनिझम आणि सर्व्हिसिंग सेंटर ते मुंबईमध्ये उघडत आहेत. टेस्लाचं बुकिंग हे या सेंटरपासून सुरु करणार आहेत. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

ज्याची आपण वाट बघत होतो ती टेस्ला मुंबईपासून देशभरात लाँच होतेय, याची शंभर टक्के उपयोगिता पुढच्या काळात होईल. महाराष्ट्राने EV साठी जी पॉलिसी तयार केली आहे ज्यात चार्जिंग व्यवस्थेसह गाडीवरच्या करापर्यंत, वाहने तयार करण्यासाठी वेगवेगळी सूट आपण दिली आहे.

त्यामुळे आज महाराष्ट्र हे EV साठी आवडतं केंद्र झालंय. ईव्हीसाठी लवकरच देशातली सर्वात मोठी क्षमता असणारं केंद्र भारतात तयार होईल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, टेस्ला कंपनीचे मुंबईत चार मोठे चार्जिंग स्टेशन आणि 32 चार्जिंग इंफ्रास्टक्चर तयार करण्यात येणार आहेत. यात केवळ पंधरा मिनिटांमध्ये चार्जिंग आणि 600 किमी चालणारी ही गाडी आहे. टेस्लाचा जगभरात एकही अपघात नाही असा रेकॉर्ड आहे.

admin
Author: admin

और पढ़ें