Search
Close this search box.

Maharashtra Politics : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यापदी धुरा कोणाच्या हाती देण्यात आली हे स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या विजयामुळे राज्यातील सहकारी राजकारणात त्यांचा पुन्हा एकदा कमबॅक झाला आहे. अजित पवार यांचं ब वर्ग संस्था मतदार संघातून 101 पैकी 91 मतांनी निवड झाली आहे. अजित पवार यांना प्रशासनाबरोबर सहकारी क्षेत्राचा 35 वर्षांचा अनुभव असून उपाध्यक्षपदाची जबाबदारी संगीता कोकरे यांना देण्यात आली आहे.

कोकरे या नीरावागज गटातून 8 हजार चारशे चाळीत मतांनी निवडूण आल्या आहेत. संगीत कोकरे यांनी माळेगावचे संचालिक म्हणून 25 वर्ष जबाबदारी पेलली आहे. माळेगाव पंचवार्षिक निवडणूक 25 जूनला झाली होती. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली निळकंठेश्वर पॅनेसने 21 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. अशाप्रकारे त्यांनी माळेगावची सत्ता पुन्हा खेचून आणण्यात यश मिळालं आहे.

अजित पवारांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष निवडीवर विरोधकांचा आक्षेप
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज निवड करण्यात आली आहे. या निवडीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. ब वर्ग गटातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन होता येत नाही. असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे. असं चंद्रराव तावरे म्हणाले. तर अजित पवारांची निवड ही बेकायदेशीर असल्याचं माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे म्हणाले.

‘माळेगाव’चे स्थापनेपासून आजपर्यंतचे चेअरमन

१) (कै) गणेश गोपाळ शेंबेकर उर्फ दादासाहेब (३१.८. १९५५)

२) दत्तात्रय गणेश शेंबेकर (१९५५-१९५९),

३) वीरसिंह चंद्रसेन जाधवराव (१८.५.१९६० – २७.१०.१९६४)

४) श्रीरंगराव कृष्णराव जगताप (२८.१०.१९६४ ते ३०. ६.१९६७)

५) माधवराव गेनबा तावरे (३१.६.१९६७ ते २१.१२.१९६७)

६) भीमदेवराव साधुजी गोफणे (२२.१२.१९६७ ते ३०. ६.१९६८)

७) माधवराव गेनबा तावरे (१९. ७.१९६८ ते ३०.११.१९६८)

८) शंकरराव गणेश दाते (१.१२.१९६८ ते ३०.११.१९६९)
९) गुलाबराव साहेबराव ढवाण (३०.११.१९६९ ते २०.१२.१९७०)

१०) माधवराव गेनबा तावरे (२६.१२.१९७० ते १२.१२.१९७३ )

११) वीरसिंह चंद्रसेन जाधवराव (१२.१२.१९७३ ते ३०. ७.१९७९)

१२) शिवलिंग संगमनाथ हिरेमठ ( ३१. ७.१९७९ ते २७.११.१९८५)

१३) चंद्रराव कृष्णराव तावरे (२८.११.१९८५ ते १७. ८.१९९२, ९. ९. १९९७ ते ५. ४.२०००, २०. ५.२००५ ते १५.११.२००७ )

१४) बाळासाहेब पाटील तावरे (२८. ९.१९९३ ते ८. ९.१९९७, १८.०९.२००२ ते १९. ५.२००५, १६.११.२००७ ते १८. ४.२०१५, ८. ३.२०२० ते २२.९.२०२३),

१५) संपतराव केशवराव तावरे (६. ४.२००० ते १७. ९.२००२)

१६) रंजनकुमार शंकरराव तावरे (१९.४.२०१५ ते ७. ३.२०२०)

१७) केशवराव सर्जेराव जगताप (२२.९.२०२३ ते ५.७.२०२५)

admin
Author: admin

और पढ़ें