भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. भारतानं आज 64 धावांवर 1 बाद या धावसंख्येवरुन पुढं फलंदाजीला सुरु केली. करुण नायर आणि केएल राहुल या दोघांची जोडी मैदानावर उतरली. मात्र, केएल राहुल आणि करुण नायर चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाले. आज करुण नायर पहिल्यांदा 26 धावांवर बाद झाला. यानंतर सलामीवर केएल राहुल यानं 55 धावा केल्या.यानंतर मैदानावर भारताचा कॅप्टन शुभमन गिल आणि उपकॅप्टन रिषभ पंत मैदानावर फलंदाजी करत आहेत. रिषभ पंतनं दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी सुरु केली. रिषभ पंतनं टंगला पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार मारला. रिषभ पंतच्या हातातून बॅट अनेकदा निसटत असते आज देखील तसाच प्रसंग घडला. चौथ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारतानं 3 बाद 177 धावा केल्या आहेत. या सत्रात भारतानं 113 धावा केल्या तर 2 विकेट गमावल्या.
रिषभ पंतन मैदानावर फलंदाजीला उतरताच इरादे स्पष्ट केले. रिषभ पंतनं पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार मारला. यानंतर रिषभ पंतनं इंग्लंडच्या गोलंदाजांवर आक्रमकपणे प्रहार करणं सुरुच ठेवलं. रिषभ पंतनं लंचपर्यंत 35 बॉलमध्ये 41 धावा केल्या आहेत. रिषभ पंतनं 5 चौकार आणि 2 षटकार मारले. रिषभ पंतनं या डावात आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. रिषभ पंतनं एक षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅट बॉलला लागलीच नाही, रिषभच्या हातातून बॅट निसटली आणि मैदानात दूर अंतरावर जाऊन पडली. विशेष बाब म्हणजेच बॅट जिथं पडली तिथं कोणताही खेळाडू नव्हता.
रिषभ पंतच्या हाताून बॅट निसटल्यानंतर त्याला शांततेत आणि नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला देण्यासाठी कॅप्टन शुभमन गिलनं त्याची भेट घेतली. रिषभ पंतला फार हवेत शॉट मारण्याची गरज नाही असं शुभमन गिल म्हटला असावा असा अंदाज समालोचकांनी वर्तवला आहे.
भारताकडे 357 धावांची आघाडी
भारतानं पहिल्या डावात 180 धावांची आघाडी मिळवली होती. दुसऱ्या डावात आज करुण नायर आणि केएल राहुलची जोडी मैदानावर उतरली. करुण नायरनं 26 धावा केल्या, तर केएल राहुलनं 55 धावा केल्या. केएल राहुल बाद झाल्यानंतर मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतनं आक्रमक बाणा दाखवला. रिषभ पंत सध्या 41 धावांवर खेळत आहे.
