जुलै महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमती कमी केल्या आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती 58.5 रुपयांनी कमी केल्या असून हे दर 1 जुलै पासून लागू होतील. मात्र घरगुती सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यापूर्वी 1 जूनला 19 किलोग्रामच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये कंपन्यांनी 24 रुपयांनी कमी केल्या आहेत.
आता किती झालीये गॅस सिलेंडरची किंमत?
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे जारी करण्यात आलेल्या नव्या किमतींनुसार दिल्लीमध्ये 19 किलोग्रामचा LPG सिलेंडर आता 1665 रुपयांना मिळणार असून याची पूर्वीची किंमत 1723.50 रुपये होती. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत आधी 1826 रुपये होती, ती आता 1768.5 रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आधी 1674.50 रुपये होती आता 1 जुलै पासून ती 1616 झाली आहे. चेन्नईत 19 किलोग्रामच्या LPG सिलेंडरची किंमत यापूर्वी 1881 रुपये होती, जी आता 1822.5 झाली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही :
ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल केले आहेत, परंतु घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये 14 किलोग्रामवाल्या घरगुती एलपीजी सिलेंडर 853 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 879 रुपये असून मुंबईमध्ये 852.50 रुपये तर चेन्नईमध्ये 868.50 रुपये आहे. 8 एप्रिल 2025 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, त्यानंतर 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
