Search
Close this search box.

‘माझ्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नका’ राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन; कारणही सांगितलं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

14 जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक त्यांना शुभेच्छा द्यायला शिवतिर्थावर येतात. मनसे अध्यक्षदेखील प्रत्येकाच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. पण यंदा हे मनसैनिक राज ठाकरेंना शिवतीर्थआवर भेटू शकणार नाहीत. मनसे अध्यक्षांनी यासंदर्भातलं आवाहन केलंय. काय म्हणालेयत राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.

काय म्हणाले राज ठाकरे?

येत्या 14 जून 2025 रोजी म्हणजेच वाढदिवसाला आपली भेट होणं शक्य नाही. कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबईबाहेर जात असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मी वाढदिवस साजरा करणार नाहीय का? काही विशेष कारण आहे का? तर असं कोणतचं  कारण नाहीय. याचे कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहनही त्यांनी केलंय.

गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळेजण येता. तुमच्याशी त्यादिवशी बोलणं होत नाही पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट उर्जा देणारी असते. तुम्हा सर्वांच प्रेम मी आयुष्यात कमावलंय. या प्रेमाबद्दल मी तुमचा ऋणी आहे आणि पुढेदेखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट घेता येणार नाही, याची रुखरुख लागेल, असेही ते पुढे म्हणाले.

मी लवकरच तुमच्या भेटीला येईल. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला येईन. त्यांचं दर्शन घ्यायला येईन. तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील यात तीळमात्र शंका माझ्या मनात नसल्याचे ते म्हणाले.

माझ्या वाढदिवशी तुमच्या भागात लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर येऊ नका. आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले.

admin
Author: admin

और पढ़ें