दोन दिवसांच्या विश्रांंतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सुरु झाला आहे. मुंबईचही दुपासपासून मुसळधार पावासाला सुरुवात झाली. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईचा वाहतूकीचा वेग मंदावला आहे. मुंबईला 3 तासांचा रेड अलर्च देण्यात आवा आहे.
भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसाठी पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.12 ते 13 जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज राज्यातील घाट परिसरात पाऊस पडेल. तर, मुंबईत आज तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कल्याण-डोंबिवलीत अचानक जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस आल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
रायगडमध्ये सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावलीय.अलिबागसह उरण, माणगाव, नागोठणे, पाली आणि इतर ठिकाणी पावसानं हजेरी लावलीय. पावसाच्या सरींमुळे हवेत गावात निर्माण झाल्या. त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय.
प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील तीन दिवसात मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव मधे तर उद्या ८ जून रोजी नांदेड परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड मधे व 9 जून रोजी नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो.. दरम्यान अवकाळी पावसाच्या सलग हजेरीनंतर पावसाने दडी मारली आहे , आता येणार पाऊस पेरणीसाठी गरजेचं आहे, त्यामुळं बळीराजा सुद्धा आता आभाळाकडे डोळे लावून बसलाय…
