Search
Close this search box.

‘मातोश्रीवर चाललोय!’, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान राज यांची गुगली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची सर्वात जास्त चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही यासाठी सकारात्मक दिसत असले तरी आता पहिलं पाऊलं कोण टाकणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेने आता साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

राज ठाकरेंचें निवासस्थान शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील राजकारणाचे एक केंद्र म्हटले जाते. सत्ताधारी असो वा विरोधक, शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी येत असतात. चहापानासाठी आलो होतो, सहज भेटीसाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया देत असले तरी शिवतीर्थावरील भेटीतून अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे माध्यमकर्मींचादेखील शिवतीर्थाबाहेर राबता पाहायला मिळतो. आज राज ठाकरे शिवतीर्थाहून बाहेर पडले आणि गाडीत बसून कुठेतरी चालले होते.

यावेळी पत्रकारांनी नेहमीप्रमाणे त्यांना अनेक प्रश्न विचारले. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? तुम्ही टाळी देणार का? मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र दिसणार का? असे अनेक प्रश्न त्यांना एकाचवेळी विचारले गेले. त्यात एक प्रश्न तुम्ही कुठे चाललात? हादेखील होतो. दरम्यान राज ठाकरेंनी गाडीची काच खाली करुन पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर दिलंय.

‘मातोश्रीवर चाललोय’ अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानंतर तात्काळ घरगुती कामासाठी बहिणीकडे चाललोय, असे ते पुढे म्हणाले. राज ठाकरेंचा मिश्किल स्वभाव आणि हजरजबाबीपणा साऱ्यांच्या परिचयाचा आहे. त्यामुळे ‘मातोश्रीवर चाललोय’ असे म्हणून फिरकी आपली फिरकी घेतली गेलीय, हे कळायला पत्रकारांना फारसा वेळ लागला नाही.

दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच…

आता उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात सकारात्मक संदेश दिल्याचं वृत्त ‘सामना’मध्ये छापून आलं आहे. मात्र हे वृत्त छापताना ‘सामना’च्या मुख्य मथळ्याखालीच उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची बातमी झळकली आहे. मात्र या बातमीच्या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या बातमीसाठी राज आणि उद्धव ठाकरे बाजूबाजूला बसून एकमेकांशी हितगुज करतानाचा जुना फोटो छापण्यात आला आहे. या फोटोत उद्धव राज ठाकरेंना काहीतरी सांगत असून राजही थोडं उद्धव यांच्या बाजूला झुकून त्यांचं म्हणणं ऐकत असल्याचं दिसतंय. शिवसेनेमधून बाहेर पडून मनसेची स्थापना करणाऱ्या राज ठाकरेंचा मागील 19 वर्षांमध्ये म्हणजेच जवळपास दोन दशकांमध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच ‘सामना’च्या मुख्य बातमीला आणि तो ही एवढा मोठा फोटो छापण्यात आला आहे. यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. हा फोटो म्हणजे दोन्ही सेनांमधील चर्चा सकारात्मक सुरु असल्याचा संदेश असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवारांचा राज यांना टोला

पत्रकारांनी शरद पवारांना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच चर्चेत असलेला ठाकरे बंधुंच्या दोन्ही सेनांच्या संभाव्य युतीबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारला. राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगर पालिकेत काय परिस्थिती असेल? असं शरद पवारांना विचारण्यात आलं. यावर शरद पवारांनी राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत असं म्हटलं, “आता पर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभाना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत,” असं विधान पवारांनी केलं.

admin
Author: admin

और पढ़ें