Search
Close this search box.

Housefull 5 चा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुडगूस, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट ६ जून रोजी जगभरातील चित्रगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं असून ह एक मल्टी स्टारर सिनेमा आहे. या सिनेमात तब्बल १८ लोकप्रिय कलाकार आहेत.

‘हाऊसफुल ५’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईनं अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागं टाकलं आहे आहे. ‘केसरी चॅप्टर २’ नं पहिल्या दिवशी ७.७५ कोटी रुपये कमावले होते. ‘हाऊसफुल ५’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास २३ कोटींच्या घरात कमाई केली आहे.

‘हाऊसफुल ५’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पहिल्या वीकेंडला आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये प्रदर्शित झाला आहे – ‘हाऊसफुल ५ए’ आणि ‘हाऊसफुल ५बी’. म्हणजे एका सिनेमाचे दोन वेगवेगळे शेवट असणार आहेत. सिनेगृहात गेलेल्या दोन स्क्रिनमध्ये दोन वेगळे क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

‘हाऊसफुल ५ए’ मध्ये शुक्रवारी हिंदी शोमध्ये एकूण २८.८८ टक्के प्रेक्षक होते, तर रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक ४५.६५ टक्के प्रेक्षक होते. ‘हाऊसफुल ५बी’ मध्ये त्याच दिवशी हिंदी शोमध्ये एकूण १६ टक्के प्रेक्षक होते, तर रात्रीच्या शोमध्ये २७.१८ टक्के प्रेक्षक होते.

अक्षय कुमारच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला ‘फुल टू एंटरटेनिंग’ म्हटलं आहे, तर काहींनी टीका केली आहे. एका सोशल मीडिया युझरनं म्हटलं आहे की, नॉन-स्टॉप हसणं, सस्पेन्स! प्रत्येक पात्र चमकलंय, प्रत्येक सीनमध्ये काही तरी ट्विस्ट… क्लायमॅक्सनं सर्वांना शांत केलं! दुसऱ्या एकानं लिहिलं की, आज Housefull 5 पाहिला, आणि खरं सांगायचं तर, अर्ध्यातच डोकेदुखी सुरू झाली. बॉलिवूडची क्रिएटिव्हिटी कुठे हरवली आहे?”

चित्रपटाची कथा एका जहाजावर घडते, जिथं अनेक जण एका दिवंगत अब्जाधीशाचे पुत्र असल्याचा दावा करतात आणि त्यांची संपत्ती मिळवण्यासाठी स्पर्धा करतात. नंतर एक खून होतो आणि सिनेमात अनेक घडामोडी घडत जातात. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कमल हासन यांच्या ‘ठग लाइफ’ चित्रपटानंतर ‘हाऊसफुल ५’ प्रदर्शित झाला आहे. Housefull 5 मुळे आता ‘ठग लाइफ’ मागे पडल्याचं चित्र आहे.

admin
Author: admin

और पढ़ें