Search
Close this search box.

कॉलेजमधील प्रेयसी पुन्हा परतली, सैन्यातील कर्मचाऱ्याने पत्नीला किटकनाशकांचं इंजेक्शन दिलं अन्….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने त्याच्याच पत्नीचा निर्घृणपणे खून केला आहे. धुळ्यात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव कपिल बाळू बागूल असं असून हत्या झालेल्या महिलेचे नाव शारदा आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महिलेचा पती, सासू, नणंद आणि पतीची प्रेयसी यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने अनैतिक संबंधांना विरोध केला म्हणून पेस्टीसाईडचं इंजेक्शन देऊन पत्नीचा निर्घृणपणे खून केला. पतीचे त्याच्याच कॉलेजमधील एका मुलीसोबत अनैतिक संबंध होते. त्याच्या प्रेमसंबंधांची कुणकुण पत्नी शारदा हिला लागली. तिने त्याच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

कपिल आणि शारदा यांचा 2010 साली विवाह झाला होता. या दोघांना 9 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. कपिल धुळ्यात ज्या कॉलेजमध्ये होतो तिथे त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र 2007 साली  तिचे लग्न झाले होते. तिला दोन मुली आहेत. मात्र सध्या तिचे पतीसोबत खटके उडत होते. त्यामुळं तिचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे. काही वर्षांपूर्वी ती पुन्हा एकदा कपिल यांच्या सानिध्यात आली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले.

 

प्रेयसीसोबत पुन्हा संबंध निर्माण झाल्यानंतर कपिलने शारदाला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे कपिल बागुल यांनी पूर्वनियोजित कट करत पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन शारदाचा निर्घृणपणे खून केला. विषप्रयोग केल्यानंतर शारदाच्या तोंडातून फेस यायला लागला. त्यानंतर शारदाचा दीड तासांत मृत्यू झाला. शारदा विषप्रयोगामुळं तडफडत असताना तिच्याकडे एकटक बसला होता.

या प्रकरणी मयत शारदाच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शारदाचा पती कपिल बागुल, सासू, सासरे, नणंद, तसेच कपिलच्या प्रेयसीला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें