Search
Close this search box.

पोलिसांची नजर चुकवून ‘ती’ सलमानच्या घरापर्यंत पोहचली, दरवाजा वाजवला अन्…; सुरक्षा यंत्रणांना पत्ताच नाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अभिनेता सलमान खान राहत असलेल्या इमारतीत शिरलेल्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असताना गुरूवारी आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी एका मॉडेलला सलमानच्या घराजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही तरूणी सलमानच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होती. बेकायदेशीररित्या खासगी मालमत्तेत शिरल्याप्रकरणी या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणीला नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सलमानच्या घरात अशाप्रकारे घुसखोरी करण्याचा हा दोन दिवसामधील दुसरा प्रयत्न आहे.

नजर चुकवून इमारतीत शिरली

सुरक्षा रक्षक व पोलिसांची नजर चुकवून गुरूवारी ही तरूणी सलमानच्या इमारतीत शिरली होती. ही तरूणी पंचवीशीतील असून खार येथे वास्तव्यास आहे. ती व्यवसायाने मॉडेल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरूणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने तिची चौकशी केली. चोरुन, लपून घरात शिरण्यामागे कोणताही घातपाताचा हेतू नसल्याचे चौकशीत स्पष्ट झालं. पोलिसांनी या तरुणीला नोटीस देऊन सोडलं. दोन दिवसांतील ही दुसरी घटना असल्यामुळे सलमानच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.

सलमानच्या घराचं दार वाजवलं अन्…

इशा छाब्रिया असं या 36 वर्षीय तरुणीचं नाव असून सलमाननेच आपल्याला भेटीसाठी बोलावलं होतं असा दावा तिने केला आहे. विशेष म्हणजे इशा अगदी सलमानच्या घराच्या दारापर्यंत पोहोचली होती. तिने सलमानच्या घराचं दारही वाजवलं होतं, असं ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘सलमान खानच्या घराचं दार त्याच्या घरातील कर्मचाऱ्यांनी उघडलं. मात्र या महिलेला कोणीही भेटायला बोलावलेलं नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांना याबद्दल कळवल्यानंतर महिलेला ताब्यात घेण्यात आलं.’

 

कारमध्ये लपून सलमानच्या इमारतीत घुसखोरी; एक अटकेत

बुधवारी सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्तीने अचानक प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती.  पोलिसांची नजर चुकवत हा तरुण कारच्या मागील बाजूस लपून सलमान खानाच्या इमारतीत घुसला होता. मात्र त्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. जितेंद्रकुमार सिंह असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा छत्तीसगडचा रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं आहे. इमारतीत प्रवेश करण्याच्या काही तासांपूर्वी जितेंद्रकुमार सिंहला गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर फिरताना पोलिसांनी हटकले होते. भारतीय न्याय संहिता कलम 329(1) (ट्रेसपासिंग) केल्याप्रकरणी अटक केली आहे.

योग्य सुरक्षा पुरवली जातेय

सलमानच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, सलमान खानला योग्य सुरक्षा दिली आहे. यंत्रणा योग्य काम करत आहे, असं म्हटलं आहे.

सलमानच्या घरावर झालेला गोळीबार

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना आणि सलमानवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्यांना अटक केली होती. सदर हल्ल्यानंतर सलमानच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें