Search
Close this search box.

खरंच शिर्डीच्या साई संस्थानकडे सोनं ठेवायला जागा नाही एवढं सोनं आहे का? समोर आलं सत्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिर्डीतील साई संस्थानकडे देणगी स्वरूपात आलेले सोने ठेवायला जागा कमी कमी पडत आहे अशा आशयाचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा संदर्भ देत सोने साई संस्थानाला ठेवायला जागा कमी पडत असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. साई संस्थानाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. साई संस्थानने याबाबत नेमका काय खुलासा केलाय, बघूया…

शिर्डी संस्थानाकडे सोन्याच्या कोणकोणत्या गोष्टी? एकूण सोनं किती?

शिर्डीच्या साईबाबांना भाविक रोख रकमेसह सोने आणि चांदीच्या स्वरुपात देखील दान करत असतात. साई संस्थानकडे 514 किलो सोने आणि 6 हजार 600 किलो चांदी जमा आहे. प्राप्त सोन्यामध्ये साईबाबांचं सिंहासन, साई मंदिराचा गाभारा, साईबाबांचे मुकूट, साईबाबांचे हार आणि रोजच्या वापरातील इतर साहित्याचा समावेश आहे. संस्थानाकडे असलेल्या सोन्याची किंमत 484 कोटींहून अधिक आहे.

संस्थान या सोन्याचं करत काय?

उर्वरित सोन्यापैकी 156 किलो सोनं वितळून त्याची एक, दोन, पाच आणि दहा ग्रॅमची नाणी करून विकण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने 2021 साली घेतला होता. मात्र या निर्णयाला 2023 मध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी विरोध करत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. नाणी बनवण्याऐवजी साई संस्थानने हे सोने केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायजेशन स्कीममध्ये गुंतवणूक करावे अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. हे प्रकरण 2023 पासून न्याय प्रविष्ट असून 27 जून 2025 रोजी यावर सुनावणी होणार आहे.

 

जागा कमी पडत असल्याच्या दाव्यावर संस्थानाचं म्हणणं काय?

दरम्यान सोन्याची नाणी बनवण्यासंदर्भात प्रकरण न्याय प्रविष्ट असतानाच साई संस्थानकडे सोने चांदी ठेवायला जागा कमी पडतेय असा दावा याचिकाकर्ते संदिप कुलकर्णी यांनी केलाय. मात्र साई संस्थानने हा दावा फेटाळून लावला असून संस्थानकडे भरपूर जागा आहे हे सोने संस्थानच्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलं आहे.

दुबईतील साईभक्ताकडून शिर्डीत साईंच्या चरणी 24 लाखांचे ‘ॐ साई’ सुवर्णाक्षर अर्पण

साईचरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देतात. शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी दुबई येथील एका साईभक्ताने 270 ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ‘ॐ साई’ हे नाव आज, सोमवारी अर्पण केले. या सुवर्ण दानाची किंमत 24 लाख 840 रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. साईचरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देतात. आज दुबईस्थित एका हॉटेल व्यावसायिकाने 24 लाखांचे सुवर्ण ‘ॐ साई’ साईबाबांच्या चरणी अर्पण केले. साईबाबा नेहमीच द्वारकामाई बसत असल्याने ॐ साई ही सुवर्ण अक्षरे द्वारकामाई येथे बसविण्यात आली. यावेळी संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. या भक्ताने आपले नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें