शालेय जीवनातील टप्पा पूर्ण करून महाविद्यालयीन जीवनाच्या दिशेनं जाणाऱ्यासाठीची पहिली पायरी, अर्थात इयत्ता दहावीचा निकाल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 10 मे रोजी जाहीर होत आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मुल्यांकनासाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार असून,तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळवणं अनिवार्य असेल. फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा पुनर्मुल्यांकनासाठीचा अर्ज निकालानंतरच्या पाच कार्यालयीन दिवसांच्या आत निर्धारित शुल्कासह पाठवावा.
दहावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येणार?
– mahahsscboard.in
–mahresult.nic.in
या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
किती वाजता जाहीर होणार निकाल?
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बोर्डाची परिक्षा होणार असून, दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं त्यांचे गुण पाहता येणार आहेत.
