Search
Close this search box.

BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 5 खेळाडूंचा पत्ता कट, एका मराठमोळ्या खेळाडूचा समावेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोमवारी बीसीसीआयकडून बहुप्रतीक्षित सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करण्यात आलेली आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये यंदा 35 खेळाडूंना स्थान देण्यात आलं असून त्यांना A+, A, B आणि C अशा ग्रेडमध्ये विभागण्यात आलंय. यंदा 5 नव्या खेळाडूंना BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये संधी मिळाली असून 2023 -24 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग असणाऱ्या 5 खेळाडूंचा नव्या कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

BCCI चं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? 

बीसीसीआयचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट हे वार्षिक रिटेनरशिप प्रणाली आहे. जे क्रिकेटर्सला त्यांचे प्रदर्शन, भारतीय क्रिकेटमधील योगदान, इत्यादींच्या आधारे वर्गीकृत आणि पुरस्कृत करते. बीसीसीआयनुसार सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी एका सत्रात ३ टेस्ट सामने किंवा 8 वनडे किंवा 10 टी 20 सामने खेळले आहेत. जर खेळाडू या मापदंडात बसत असेल तर तो रिटेनरशिपसाठी पात्र ठरतो. बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टच्या 4 कॅटेगरी असतात यात A+, A, B आणि C यांचा समावेश असतो. खेळाडूंच्या योग्यतेनुसार त्यांना विविध कॅटेगरीमध्ये विभागले जाते. यानुसार त्यांना वर्षाचा पगार दिला जातो.

कोणत्या खेळाडूंना संधी? 

यंदा बीसीसीआयने A+ ग्रेडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह इत्यादींचा समावेश केला आहे. बीसीसीआयच्या ग्रेड A सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, केएल राहुल, रिषभ पंत, शुभमन गिल, हार्दिक पंड्या इत्यादी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. यंदा बीसीसीआयने A+ ग्रेडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह इत्यादींचा समावेश केला आहे. बीसीसीआयच्या ग्रेड A सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, केएल राहुल, रिषभ पंत, शुभमन गिल, हार्दिक पंड्या इत्यादी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

5 खेळाडूंचा पत्ता कट? 

बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 2023 -24 चा भाग असलेल्या 5 खेळाडूंना यंदाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 2024- 25 मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, आवेश खान, जितेश शर्मा, जितेश शर्मा, उमरान मलिक इत्यादींचा समावेश आहे. तर याऐवजी यंदा वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा, नीतीश राणा, हर्षित राणा, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश आहे. बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार A+ ग्रेडमध्ये मोडणाऱ्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये, A ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, B ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर C ग्रेडमधील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात.

लॉर्ड ठाकूर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर : 

भारताचा मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूर याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2023 च्या शेवटी साऊथ आफ्रिकेविरुद्ध डिसेंबर महिन्यात खेळला आहे. तिथपासून ते सर्व टीम इंडियातून बाहेर आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करून सुद्धा त्याला टीम इंडिया पुन्हा संधी मिळाली नाही. शार्दूल हा रोहित शर्माचा खूप जवळचा मित्र आहे. भविष्यात ऑल राउंडर शार्दूल ठाकूर पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करेल अशी आशा त्याचे फॅन्स व्यक्त करतायत.

admin
Author: admin

और पढ़ें