आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाचा संघ ज्या बंजारा हिल्स येथील पार्क हयात हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे, त्या हॉट्लमध्ये सोमवार आग लागली. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू हे सहाव्या मजल्यावर होते. आगीचे वृत्त त्यांच्यापर्यंतही पोहोचले होते. त्यामुळे त्यांना प्रथम बाहेर काढण्यासाठी हॉटेल प्रशान प्रयत्न करताना पाहायला मिळाली.
हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून धूर यायला लागला आणि हॉटेलचे कर्मचारी घाबरले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी थेट अग्नीशमन दलाला फोन केला. हे सर्व घडत असताना सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंना आगीचे वृत्त समजले आणि त्यांच्या संघातील खेळाडूही घाबरले. पण हॉटेल प्रशासनाने त्यांना शांत केले आणि त्यांना त्वरीत कसे बाहेर काढता येईल, याबाबत माहिती दिली.
या हॉट्लमध्ये आग कशी लागली….
आयपीएलचा संघ राहतो त्या एवढ्या हॉटेलमध्ये आग कशी लागली, याचा तपास सुरु झाला. पण ही आग कशी लागली, याचे कारण अद्याप कळलेले नाही. या गोष्टीचा तपास अग्नीशमन दलाचे कर्मचारी करत आहेत. अग्मीशमन दलाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. पम अजूनही अग्नीशमन दल आपला तपास करत आहेत. हॉट्लच्या पहिल्या मजल्यावरून धूर नेमका कसा आला आणि आग कशी लागली, याचा तपास पोलीसही करत आहेत.
हैदराबादच्या शहरात आगीचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरात साधारण ७-८ ठिकाणी भीषण आग लागल्याचे पाहायला मिळाले आहे. हैदराबादचा संघ गेल्याच सामन्यात फॉर्मात आला आहे. कारण गेल्या सामन्या अभिषेत वर्माच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने दमदार विजय साकारला होता. आतापर्यंत हैदराबादचा संघ सहा सामने खेळला आहे, पण या सहा सामन्यांमध्ये त्यांना फक्त दोन विजय मिळवता आले आहेत, तर चार सामन्यां
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने या हंगामात धडाकेबाज फलंदाजी केली आहे. त्यामुळे आता या आगीच्या सत्रानंतर हैदराबादच्या संघाचे वास्तव्य नेमकं कुठे होणार, हे पाहावे लागणार आहे.
