पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर सत्तास्थापनेचा तिढा सुटला आहे. आज 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारस्थापनेसह महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या नेृतृत्त्वातील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं पार पडणार आहे. शपथविधी ते अन्य महाराष्ट्रातील घडामोडीचा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
महायुती सरकारचा आज आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच शपथविधीपूर्वी अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे.
महायुतीमधील तिढा संपला. दबावाचं कोणतंही राजकारण नव्हतं. एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहेत.
आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत.