सुट्टया पैशांवरुन राडा; कल्याण रेल्वे स्थानकात महिला तिकीट क्लार्कला मारहाण
कल्याण रेल्वे स्थानकात महिला तिकीट क्लार्कला मारहाण करण्यात आली आहे. सुट्ट्या पैशांवरुन तिकीट काऊंटवर वाद झाला. यानंतर संतप्त प्रवाशाने रागाच्या भरात मारहाण केल्याचे महिला तिकीट क्लार्कचे म्हणणे आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. आज दुपारी कल्याण एफ ओ बी रेल्वे स्टेशन वरील रेल्वे तिकीट काउंटरच्या बाहेर असलेल्या रेल्वे तिकीट काढून देणाऱ्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसोबत दोन आरोपींची बाचबाची सुरु होती. त्यावेळेस रेल्वे महिला कर्मचाऱ्यांनी तिकीट काउंटर मधून बाहेर बघायला आल्या असताना आरोपींनी त्यांना मारहाण केली. या पैकी आन्स्सर शेख या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर, दुसरा आरोपी फरार आहे.
रोषना पाटील असे मारहाण झालेल्या महिला तिकीट क्लार्कचे नाव आहे या मारहाणीत रोषणा या जबर जखमी झाल्या आहेत. त्यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेचा निषेध म्हूणन काही वेळ तिकीट काउंटर बंद करण्यात आला होते. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे.