देश

ठाण्याच्या वेशीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्याच्या वेशीवर मुलुंड टोलनाका येथे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणूनन बॅनर्स झळकले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून त्यापूर्वी हे बॅनर मुलुंड टोलनाका परिसरात त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे पुन्हा एकदा आव्हाड राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभेचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी केली आहे. मुलुंड टोल नाका येथे लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये जितेंद्र आव्हाड यांचा थेट भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आला सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असताना विविध मंत्री आणि आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकवले जातात. भावी मुख्यमंत्री लिहिलेले केक कापूनही नेत्यांसह कार्यकर्त्यांचे ब्रॅण्डिंग केले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे, जयंत पाटील, रोहित पवार, नाना पटोले यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्ह्णून बॅनर झळकले होते.

 

 

Related Articles

Back to top button