देश

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग

दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला सायन स्थानकातील ब्रटिशकालीन पूल येत्या 1 ऑगस्टपासून बंद होणार आहे. तब्बल 2 वर्षे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ऑगस्ट 2024 ते जुलै 2006 या कालावधीत हा पूल बंद राहणार आहे.

सायन स्थानकातील 110 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूल 1 ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT)ने 2020 साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे घोषित केले होते. मात्र, परीक्षा आणि लोकसभा निवडणुका असल्यामुळं या काळात प्रवाशांची गैरसोय होईल. नागरिकांना वाहतुक कोंडीत अडकावे लागेल. यासाठी स्थानिक रहिवाशांनी विनंती केली होती. त्यामुळं या पुल पाडण्याच्या तारखा तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता अखेर प्रशासनाने पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

सायन ब्रिज हा 1912 साली बांधण्यात आला होता. तब्बल 100 वर्ष या पुलाला उलटून गेली आहेत. मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. त्यामुळं लवकरच आता प्रशासनाकडून पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान या वेळी पूल वाहतुकीसाठी बंद असताना वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग सुचवले जाणार आहेत. या पुलाच्या तोडण्याच्या आणि पुनबांधणीच्या कामाला तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. तर, दोन वर्षांचा कालावधी काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहे. सायन पुलाच्या पुर्नबांधणीसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हे असतील पर्यायी मार्ग

डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरून सायन ओव्हर ब्रिजच्या पश्चिम आणि पूर्वेकडून एलबीएस मार्ग किंवा संत रोहिदास रोडकडे वाहने वळवली जातील. यात सायन-महिम लिंक रोड,के.के.कृष्णन मार्ग,सायन हॉस्पिटल जंकश्नजवळील सुलोचना शेट्टी रोडचा ही वापर केला जाऊ शकतो.

Related Articles

Back to top button