Search
Close this search box.

मोठी बातमी! पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना अटक करण्यात आली आहे. दुबई विमानतळावरुन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी यासंबंधी वृत्त दिलं आहे. राहत फतेह अली खान यांच्या माजी मॅनेजरने केलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सलमान अहमद असं त्यांच्या माजी मॅनेजरचं नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राहत फतेह अली खान आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी संयुक्त अरब अमिराती येथे होते. यावेळी बुर्ज दुबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राहत फतेह अली खान यांच्या माजी मॅनेजरने त्यांच्याविरोधात दुबई आणि इतर शहरांमध्ये तक्रार दाखल केल्या होत्या.

या वर्षाच्या सुरुवातीला, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) गायकाविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती. मागील 12 वर्षांमध्ये राहत फतेह अली खान यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मैफिलींमधून सुमारे 8 अब्ज रुपये कमावल्याचा खुलासा त्याने केला होता.

राहत फतेह अली खान आधीच वादात अडकले असताना ही कारवाई करण्यात आली आहे. राहत फतेह अली खान यांचा मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे खळबळ माजली होती. ज्यामध्ये राहत फतेह अली खान यांनी दारूची बाटली हरवल्यावरुन एका बँड सदस्यावर कथितपणे हल्ला केला होता.

admin
Author: admin

और पढ़ें