Search
Close this search box.

Dhammika Niroshana: श्रीलंकन क्रिकेटपटूची हत्या; हल्लेखोराने घरात घुसून कुटुंबासमोर गोळ्या झाडल्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी समोर आली. आजची म्हणजे १७ जुलै २०२४ची पहाटेची सुरुवात श्रीलंकेसाठी दुःखद धक्क्याने सुरु झाली. श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूवर गोळ्या झाडण्यात आल्या. ४१ वर्षीय या क्रिकेटरवर राहत्या घरी पहाटेच्या वेळेला काही अद्याप लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली.

४१ वर्षीय श्रीलंकन माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशनावर राहत्या घरी गोळ्या झाडण्यात आल्या. काही अज्ञात इसमांनी निरोशनावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरोशनावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते घरी एकटे नव्हते. हल्ला झाला तेव्हा निरोशनासोबत त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुलेही तेव्हा घरात उपस्थित होती. पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोराने हा हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस हल्लेखोराच्या शोधात आहे.

 

अंबालगोड पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला असून हा अज्ञात आरोपी सध्या तरी फरार आहे. निरोशना यांनी श्रीलंकेकडून खेळताना श्रीलंका संघाचे नेतृत्वही केले आहे. श्रीलंकेच्या अंडर-१९ वर्ल्ड कप संघाची धुरा त्यांनी संभाळली होती. २०००मध्ये सिंगापुरविरुद्धच्या सामन्यात निरोशना यांनी पदार्पण केले असून अंडर-१९ साठी ते दोन वर्षे वन दे आणि कसोटी क्रिकेट खेळले. यादरम्यान निरोशना यांनी दहा सामन्यात संघाचे नेतृत्वही केले आहे.

 

निरोशना यांची अशी होती कारकिर्द

निरोशना यांचा जन्म हा २२ फेब्रुवारी १९८३ रोजी श्रीलंकेत झाला. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने शालेय क्रिकेट संघाची धुरा निरोशना यांच्या हाती सोपवण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटसाठी निरोशना हे चिलावा मरिन्स क्रिकेट क्लब आणि गल्ले क्रिकेट क्लबकडून खेळले. निरोशना हे उत्कृष्ट गोलंदाज होते त्यांनी प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि अंडर-१९साठी सरासरी ३०च्या खाली गोलंदाजी केली आहे. निरोशना यांनी १२ सामन्यात २६९ धावा केल्या असून १९ बळी पटकावल्या आहेत. निरोशना लिस्ट ए क्रिकेटमध्ये आठ सामने खेळले असून या फॉरमॅटमध्ये ५ बळी काढले आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें