देश

तब्बल 13 तासांनंतरही कोकण रेल्वे ठप्प; तेजस, तुतारी एक्स्प्रेस स्थानकातच उभ्या

कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गेल्या 13 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळं बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली नाहीये.

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळं रेल्वे रूळांवर दरड कोसळली आहे. त्यामुळं बोगदादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोकण रेल्वेकडून नातू नगर बोगदा येथील मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग सुरळीत होण्यास अद्याप किती वेळ लागणार हे मात्र समोर आलेले नाहीये.

कोकण रेल्वे गेल्या 13 तासांपासून ठप्प असून त्यामुळं प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. तेजस, तूतारी, कोकणकन्या विविध स्थानकांवर रखडल्या आहेत. त्यामुळं रेल्वेतील प्रवासी हैराण झाले आहे. तर, काही स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच रात्र काढावी लागली आहे.

कोकण रेल्वे गेल्या 13 तासांपासून ठप्प असून त्यामुळं प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. तेजस, तूतारी, कोकणकन्या विविध स्थानकांवर रखडल्या आहेत. त्यामुळं रेल्वेतील प्रवासी हैराण झाले आहे. तर, काही स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच रात्र काढावी लागली आहे.

कोकणात मुसळधार

कोकणात रविवारी मुसळधार पाऊस झाला. आजही रायगड रत्नागिरीसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि दक्षिण रायगड या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाड, माणगाव आणि पोलादपूर या तीन तालुक्यात शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात आज अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी आहे. प्रशासन सतर्क आहे.

ही गाडी रद्द

1) 14/07/2024 रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक 50103 दिवा रत्नागिरी प्रवासी प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.

गाड्यांचे वळण:

१) गाडी क्र. 12742 पटना वास्को द गामा एक्सप्रेसचा प्रवास 13/07/2024 रोजी जिते येथे सुरू झाला आणि कल्याण लोणावळा पुणे मिरज लोंडा-मडगाव मार्गे वळवला जाईल.

२) गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक (टी) मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास १४/०७/२०२४ रोजी रोहा येथे सुरू होत असून ती कल्याण- लोणावळा- पुणे- मिरज- लोंडा- मडगाव- ठोकूर मार्गे वळवली जाईल.

3) ट्रेन क्र. 16335 गांधीधाम- नगरकोइल जं. 12/07/2024 रोजी विन्हेरे येथे सुरू होणारा एक्सप्रेस प्रवास कल्याण लोणावळा पुणे मिरज – लोंडा मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन मार्गे वळवला जाईल.

4) गाडी क्र. 12284 H. निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्स्प्रेसचा प्रवास 13/07/2024 रोजी माणगाव येथे सुरू होतो आणि कल्याण लोणावळा पुणे मिरज – लोंडा मडगाव-ठोकूर – मंगळुरु जंक्शन मार्गे वळवला जाईल.

5) Train no. 16345 Lokmanya Tilak (T) Thiruvananthapuram Central Express journey commences on 14/07/2024 now at Karanjadi will be backed & diverted via Kalyan – Lonavala – Pune – Miraj Londa Madgaon – Thokur – Mangaluru Jn – Ernakulam.

गाड्यांचे वेळापत्रक पुनर्संचयित:

१) गाडी क्र. १२१३३ मुंबई सीएसएमटी- मंगळुरु जं. एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होतो

14/07/2024 21.54 वाजता प्रस्थानाचे वेळापत्रक 15/07/2024 रोजी 02.00 वाजता पुन्हा शेड्यूल केले जाईल.

) ट्रेन क्र. 11003 दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा प्रवास 2 15/07/2024 रोजी 00.05 वाजता सुटण्याच्या वेळापत्रकानुसार 03.05 वाजता पुन्हा शेड्यूल केला जाईल

गाड्यांचे नियमन:

१) गाडी क्र. 10104 मडगाव जं. मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस खेड येथे 17:40 पासून

२) गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस दिवाणखावटी येथे 17.43 वा.

3) ट्रेन क्र. 12052 मडगाव जं. मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी येथे दि 16:54 तास

4) गाडी क्र. 22120 मडगाव जं. मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस रत्नागिरी येथे 17.50 वा.

Related Articles

Back to top button