Search
Close this search box.

वर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वर्ध्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या आवारात घुसून तरुणाने 6 वेळा या तरुणीवर वार केले. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

घराच्या आवारात पोहोचला अन्…

समोर आलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार देवळी तालुक्यातील भिडी गावामध्ये घडला आहे. आरोपीचं नाव संदीप बसराव असं आहे. आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणी घरी एकटीच असताना आरोपी तिच्या घरी आला. ही तरुणी घराच्या आवारात काम करत असतानाच आरोपीने तिच्यावर हल्ला केला. या तरुणाने थेट तिच्या गळ्यावर वार केला. तिने आरडाओरड केला असता शेजारी जमा झाल्याचं पाहून आरोपीनं घटनास्थळावरुन पळ काढला. शेजारी या तरुणीच्या घराच्या आवारात पोहचेले असता ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळून आलं.

 

गावकऱ्यांनी तरुणाला पडलं

नागरिकांनी प्रसंगावधान राखत या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल केलं. दुसरीकडे गावकऱ्यांनी या तरुणाचा पाठलाग करत त्याला पकडलं आणि चांगलाच चोप दिला. लोकांच्या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर देवडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा आणि तपास सुरु केला आहे.

हातावर दोन अन् पाठीवर तीन वार

या तरुणाने कैचीने तरुणीववर सहा वार केले. यापैकी एक गळ्यावर, दोन हातावर तर तीन वार पाठीवर केले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी घरी एकटीच असल्याचं लक्षात आल्यानंतर हा तरुण घरात घुसला आणि त्याने कात्रीने तरुणीवर हल्ला केला. या प्रकरणामध्ये पोलीस आता प्रकरणाची चौकशी करत असून तरुणाने हल्ल्याचं नियोजन कसं केलं आणि यामागे इतर काही हेतू होता का? त्याला इतर कोणी मदत केली का? यासारख्या प्रश्नांची उत्तर पोलीस शोधत आहेत. पोलिसांनी या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवून घेण्याबरोबरच इतर परिस्थितीजन्य पुरावे कोर्टासमोर सादर करणार आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें