Search
Close this search box.

आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि…, भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅम (Bhusi Dam) परिसरात गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. त्यापैकी पाच  जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आलं.लोणावळ्यातल्या दुर्घटनेवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंदाच्या भरात हे लोक असे पाण्यात जातात आणि घटना होतात , अशी प्रतिक्रिया अनिल पाटील म्हणाले.

अनिल पाटील म्हणाले,   लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरसात ही घटना घडली आहे. हडपसर येथील लियाकत अन्सारी आणि युनुस खान आणि त्यांचे 17 ते 18 जणांचे कुटुंब वर्षाविहाराकरता लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले होते. पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांचे कुटुंबातील एकुण 10 जण जोरदार आलेल्या पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले. त्यापैकी पाट जणांना पाण्याचे प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आले परंतु उर्वरीत पाच जण पाण्याचे प्रवाहात वाहून गेले.चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एक व्यक्ती बेपत्ता असून शोध सुरू आहे. राज्यातील सर्व ठिकाणी मुख्यसचिव जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करणार आहे.  प्रतिबंधक ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.   वर्षा पर्यटनासाठी जातात आणि आनंदाच्या भरात हे लोक असा पाण्यात जातात आणि अशा घटना घडतात.

अनोळखी ठिकाणी जाऊन कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका 

या पार्श्वभूमीवर  नागरिकांना आवाहन करण्यात  आले  आहे की, लोणावळा, खंडाळा या भागात वर्षाविहाराकरता येणा-या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात वर्षाविहाराकरता येणाऱ्या पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.तसेच  लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षाविहारा करता येणा-या पर्यटकांनी आपली व आपले कुटुंबाची योग्य ती काळजी घेऊन वर्षाविहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा. निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीसांकडून  करण्यात आले  आहे.

admin
Author: admin

और पढ़ें