जुलैच्या पहिल्या तारखेला जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे नवे दर, पाहा तुमच्या शहरात किती वाढ
जूलै महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. जून महिन्या कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारने (Karnataka Congress Govenment) सामान्य नागरिकांना जोर का झटका देत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलवरचा (Diesel Latest Price) वॅट वाढवल्याने इंधन महाग केलं आहे. सरकारच्या या निर्णयाने पेट्रोलचे दर तीन रुपये तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 3.05 रुपये प्रती लिटरने वाढ झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) जूनच्या शेवटच्या आवड्यात टॅक्समध्ये कपात करत इंधन स्वस्त केलं आहे. तेल कंपन्यांनीही सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. नव्या महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत.
1 जुलैला पेट्रोल-डिझेलचे दर
तेल कंपन्यांनी 1 जूलै 2024 रोजी सकाळी 6 वाजता इंधनचे दर अपडेट केले आहेत. जून महिन्यात देशातील अनेक शहरात तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. पण 1 जुलैला तेल कंपन्यांनी कोणताही दिलासा दिलेला नाही. इंधनाचे दर जैसे थे आहेत. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवप इंधनाचे दर देण्यात आले आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरातील इंधनाचे दर
1.दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.72 रुपये प्रती लिटर, डीझेलची किंमत 87.62 रुपये प्रती लिटर
2.मुंबईत पेट्रोलची किंमत 103.44 रुपये प्रती लिटर, डीझेलची किंमत 89.97 रुपये प्रती लिटर
3. कोलकातात पेट्रोलची किंमत 103.94 रुपये प्रती लिटर, डीझेलची किंमत 90.76 रुपये प्रती लिटर
4. चेन्नईत पेट्रोलची किंमत 100.75 रुपये प्रती लिटर, डीझेलची किंमत 92.34 रुपये प्रती लिटर
या शहरात दरात कमी-जास्त वाढ
जून महिन्यात कर्नाटक सरकारने इंधनावरच्य वॅटमध्ये वाढ गेली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल-दरात कपात झलीय. मुंबईत पेट्रोल 65 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 2.60 रुपये प्रती लिटर कमी करण्यात आला आहे.
कसं तपासाल आपल्या शहरातील इंधनाचा दर
गाडीची टीका फूल करण्याआधी आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासण्यासाठी फक्त एक एसएमएस करावा लागतो. आपल्या मोबाईलवरुन 92249 92249 या नंबरवर आपल्या शहराच्या कोडसह मेसेज पाठवा. थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर SMS च्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचे नवे दर पाठवले जातात.