देश

Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर ‘मेगा ब्लॉक’; वाचा संपूर्ण वेळापत्रक!

उद्या म्हणजेच रविवारी मस्त पावसात फिरायला जाण्याचा तुम्ही बेत आखला असेल तर थांबा. पिकनिकला जाण्यासाठी लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल उशीराने धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक

23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.24 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या वेळेतील धीम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.

 

त्याचप्रमाणे घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 वाजता सुटणारी ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावरील
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असणार आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.32 वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असणार आहे.

 

अप धीम्या मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉक होण्यापूर्वीची शेवटची लोकल ही बदलापूर लोकल कल्याण येथून सकाळी 9.13 वाजता सुटणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ही कल्याण लोकल असून ती कल्याण येथून दुपारी 2.33 वाजता सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सेवा बंद राहतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.

डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ब्लॉकपूर्वीची सकाळी 11.04 वाजता पनवेलसाठी शेवटची लोकल असणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.22 वाजता गोरेगावसाठी  शेवटची लोकल असणार आहे. यानंतर ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 04.51 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर वांद्रे पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी 04.56 वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर:

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 09.40 वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 03.28 वाजता सुटेल.
  • गोरेगाव येथून दुपारी 04.58 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल   सुटेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकावरून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

Related Articles

Back to top button