मध्य रेल्वेला पावसाचा फटका; वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने
जोरदार पावसामुळे कल्याण ते ठाणे वाहतूक मंदावली. कल्याण ते दिवा परिसरात होत असलेल्या जोरदार पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. पावसाने वाहतूक मंदावली असली मात्र अद्याप रुळांवर पाणी साचले नसल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती.
पालघर मध्ये मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका . डहाणू विरार लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने . ठिकठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या या गतीने सुरू. जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम .
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. पालघरच्या पश्चिम भागासह डहाणू , तलासरी , कासा , विक्रमगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेत, तुटुंब भरली आहेत . तर नाले ओसंडुन वाहत आहेत. दरम्यान दमदार सुरू अस लेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.