गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मुंबई- मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय गायक व संगीतकार अवधूत गुप्तेच्या आईला देवाज्ञा झाली आहे. अवधूतची आई मृदगंधा गुप्ते या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण या उपचारांना यश न आल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईतील व्होकार्ट रुग्णालयात अवधूत गुप्तेच्या आई मृदगंधा यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यांच्या उपचाराला यश आले नाही. आज अंत्यदर्शनानंतर दौलतनंगर बोरिवली ईस्ट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येतील.
एकदा एका मुलाखतीत अवधूतने त्याच्या आईचा किस्सा सांगितलेला. तो म्हणालेला की“अलीकडे काळ थोडा त्रासदायक होता, पण शेवटी आम्ही जिंकलो. माझ्या आईला अपोलो, चेन्नई येथे मिळालेल्या उपचारांचा खूप फायदा झाला. फुफ्फुसातील फायब्रोसिस ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यासाठी विशेष उपचारांची आवश्यकता असते. तिच्यात खूप सुधारणा झाल्यामुळे मला खूप बरे वाटते. आईई आपल्या मुलांना जीवन देत देतात. पण असे काही भाग्यवान असतात जे त्यांच्या आईला जीवनदान देतात, त्यांचे प्राण वाचवू शकतात.
आपल्या सभोवतालच्या लोकांशी नेहमी प्रेमाने वागत राहा असे माझ्या आईने मला नेहमी शिकवले. त्यासाठी तिने काही गोष्टींचा आग्रह धरला: मी ज्यांना भेटतो त्या प्रत्येकाचे स्वागत करायचे आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची असे सांगितले. लहानपणीही मी खेळण्यांसोबत कोपऱ्यात खेळत बसण्याऐवजी घरी आलेल्या पाहुण्यांसोबत गुंतून राहायचो. मी माझ्या सभोवतालच्या लोकांसोबत आपुलकीने वागून मोठा झालो.
रिॲलिटी शोच्या जजच्या भूमिकेत असताना स्पर्धकांवर टीका करण्याऐवजी मी त्यांना प्रोत्साहन देतो. त्यामुळे त्यांना माझ्यासोबत आणि इतर प्रत्येकासोबत सोयीचे वाटते. मी चाहत्यांसह सेल्फी घेण्यास कधीही नकार देत नाही, मग ते कितीही कंटाळवाणे असले तरीही. त्यांच्या माझ्याबद्दलच्या भावनांची ही पोचपावती म्हणजे मी माझ्या चाहत्यांचे ऋणी आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जो मला शत्रू नसल्याचा दावा करू शकतो आणि हे सर्व तिच्यामुळे आहे.”