देश

ICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा रिझल्ट व डाउनलोड करा मार्कशीट

केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE) आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना https://cisce.org/ किंवा results.cisce.org या वेबसाइटवर जाऊन रिझल्ट चेक करता येणार आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी युआयडी आणि इंडेक्स नंबरची नोंद करावी लागणार आहे.

काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) डिसेंबर 2023मध्ये बोर्डाच्या परीक्षा जाहीर केल्या होत्या. यावर्षी जवळपास 2.5 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. आयसीएसई इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत चालली होती. तर, बारावीच्या परीक्षा 12 फेब्रुवारी ते 2 एप्रिलपर्यंत होत्या. आता दहावी आणि बारावी दोन्ही इयत्तांचे रिझल्ट जारी करण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी हे रिझल्ट पाहू शकणार आहेत.

निकाल कसा पाहाल?
CISCEच्या अधिकृत वेबसाइट cisce.org/ किंवा results.cisce.org वर जा

होमपेजवर आयसीएसई किंवा आयएससी बोर्ड परीक्षा 2024 या लिंकवर क्लिक करा

आता युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड नोंद करा

आता तुमचा रिझल्ट स्क्रीनवर समोर येईल

तुम्ही तुमची रिझल्टची ऑनलाइन प्रिंट डाउनलोड किंवा प्रिंटआउट काढून स्वतःजवळ ठेवू शकता.

Related Articles

Back to top button