देश

मुंबई ते नवी मुंबई गाठा फक्त 15 मिनिटांत प्रवास, पुढच्याच महिन्यात खुला होतोय समुद्रातील ‘हा’ पुल

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा बहूप्रतीक्षित मुंबई ट्रान्स- हार्बर लिंक (MTHL) पूल लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. डिसेंबर महिन्यातच हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. समुद्रावर उभारण्यात येणारा सगळ्यात मोठा पुल असून 22 किमी लांब पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.

एमटीएचएलमध्ये जवळपास 100 किमीपर्यंतचे वेगाने कार चालवण्याची मर्यादा देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार, या पुलावरुन रोज 1 लाख वाहनं धावण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा होण्याची शक्यता असल्याने पुलावर 3 फायर फाइटिंग अँड रेस्क्यू व्हिकल आणि 2 अॅब्लॅलन्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 किमी लांब असलेल्या या पुलाचा 16 किमीपर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. पुलाचा सगळ्यात मोठा हिस्सा समुद्रावर असल्याने आपत्तीकालीन मदत लवकर मिळेल या हेतूने तात्काळ मदत देण्याची योजना बनवण्यात आली आहे.

पुलाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून आता इलेक्ट्रिक पोल, टोल नाका, अॅडमिन बिल्डिंगसह निर्माणसह अनेक लहान मोठे काम सध्या सुरू आहेत. एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्यानुसार, आगामी एक ते दीड महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जवळपास 98 टक्क्यांपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले आहे. एमटीएचएल पूल सुरू झाल्यानंतर मुंबईहून- नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. दोन शहरांमधील अंतर कमी झाल्यामुळं प्रत्येक वर्षी 1 कोटींपर्यंतच्या ईंधनाची बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडीपासूनही मुक्ती होणार आहे. यामुळं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

25 डिसेंबर रोजी मुंबई ट्रान्स लिंक प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलासाठी 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 22.08 किमी असून याचा 16 किलोमीटर भाग समुद्रात आहे. हा पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिर्लेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. एमटीएचएस पुल सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणेपर्यंतचा प्रवासही सोप्पा होणार आहे. लोणावळा- खंडाळा आणि मुंबईपर्यंतचा प्रवास 90 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील सर्वात लांब समुद्री पूल मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक १६.५ किमी लांब डेक असलेला हा भारतातील पहिला पूल असेल ज्यात ओपन रोड टोलिंग सिस्टम असणार आहे.

Related Articles

Back to top button