पाइपातून ऑक्सिजन अन् जेवण…; 24 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे, 40 मजूरांना वाचवण्यासाठी जीवाचे रान
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्याचा भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. जवळपास 40 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्याचे जिन्नसही त्यांच्यामार्फत पोहोचवले जात आहेत.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याचा जवळपास 30 ते 35 मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. रविवारी सकाळी 5.30च्या दरम्यान ही घटना घडली असून आतमध्ये 40 ते 45 जण फसले आहेत. सर्व मजुर सुरक्षित आहेत, अशी माहिती लोडर ऑपरेटर मृत्यूंजय कुमार यांनी दिली आहे.
एसडीआरएफ टीमकडून बचावकार्य करण्यात येत आहे. वॉकी-टॉकीच्या मदतीने बोगद्यात फसलेल्या मजुरांशी संपर्क केला जात आहे. पाइपलाइनच्या मदतीने आत फसलेल्या मजुरांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. बोगद्याचा मलबा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. पाच रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिल्क्यराकडे जाणाऱ्या 200 मीटर अंतरावर हे भूस्खलन झाले. तर बोगद्यात काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या 2800 मीटर आत होते.ऑलवेदर रोड प्रकल्पांतर्गत तयार होत असलेल्या बोगद्याची लांबी 4.5 किमी आहे. त्यापैकी चार किमीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापूर्वी बोगदा बांधण्याचे उद्दिष्ट सप्टेंबर 2023 होते, मात्र आता ते मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर धामी या परिस्थीतीबाबत सर्व माहिती घेत आहे. बचावकार्य वेगाने व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. संबंधित सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. मी घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मी बचावकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हा बोगदा चार धाम ऑल वेदर रोड परियोजनेचा हा भाग आहे. जिल्हा आपातकालीन परिचालन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 160 जण ड्रिलिंग उपकरण आणि उत्खननकर्तांच्या मदतीने फसलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्टिकल ड्रिलिंग मशीनसारखे काही उपकरणे घटनास्थळी आणण्याते आले आहेत.