नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ
आठवड्याची सुरुवात होत असली तरीही अनेक नोकरदारांसाठी पुढचे काही दिवस मनस्तापाचे असणार आहेत. किंबहुना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरीसाठी निघणाऱ्या रेल्वे प्रवाशांसह विद्यार्थी आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचेच प्रचंड हाल होणार आहेत. कारण, Western Railway मार्गावर आजपासून दर दिवशी एकदोन नव्हे तर, रेल्वेच्या तब्बल 3126 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव या स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आल्यामुळं प्रवाशांना हा त्रास सोसावा लागणार आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणार असाल तर, हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच निघा.
पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आणखी आठवडाभर हे काम सुरु राहणार असल्यामुळे सोमवारपासूनच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.
रेल्वे विभागाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळं शुक्रवारपासूनच पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर तुफान गर्दी पाहायला मिळाली. नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सोमवारी यात आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळेल.
रेल्वे विभागाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळं शुक्रवारपासूनच पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर तुफान गर्दी पाहायला मिळाली. नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सोमवारी यात आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. सोमवार ते शुक्रवारदरम्यानच्या काळात जर दिवशी अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर चब्बल 300 हून अधिक लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. दर दिवसाच्या तुलनेत 1000 फेऱ्यांपैकी ही संख्या रोजच्या सुमारे 23 टक्के फेऱ्या रद्द होणार असल्यामुळं याचा थेट परिणआम 30 लाखांहून अधिक प्रवाशांवर होणार आहे. या काळात प्रवाशांनी रेल्वेच्या बदलेल्या वेळापत्रकानुसारच प्रवासाचे बेत आखावेत असं आवाहन करण्यात येत आहे.