देश

Maharashtra Mumbai Rain Alert LIVE: विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईलाही इशारा

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत. कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून रायगड आणि रत्नागिरी तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे.शातील अनेक भागात पावसाने (Monsoon) जोरदार हजेरी लावलेली आहे. सध्या देशातील 20 राज्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. हिमाचल, पंजाबसारख्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. गेल्या 15 वर्षांत दिल्लीत (Delhi) जुलैमध्ये एवढा पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे 22 जुलैपासून तेलंगणामध्ये (Telangana Rain) पावसामुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जिल्हा – कोल्हापूर*
जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (MM)
दिनांक ,28/07/2023🌧️🌧️

1) कागल=26
2) गारगोटी=32
3) हातकणंगले-19
4) गडहिंग्लज =28
5) राधानगरी=
6) आजरा=33
7) शिरोळ=13
8) शाहूवाडी-80
9) पन्हाळा= 46
10) गगनबावडा-170
11) चंदगड=

रायगड जिल्ह्यात दोन दिवस तुफान बॅटिंग केल्यानंतर आज पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून मधून पावसाच्या किरकोळ सरी बरसत असून आकाशात काळया ढगांची गर्दी कायम आहे. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

Related Articles

Back to top button