Search
Close this search box.

Rain Alert : मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुढच्या तीन ते चार तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.. मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्येही मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.. तसंच डोंगराळ प्रदेश आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.. मुंबईसोबतच ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणासोबत घाटमाथ्यावरही पावसाचा जोर गुरुवारपर्यंत कायम असू शकतो. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये घाट परिसरात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें