देश

Monsoon 2023: पाऊस रेंगाळल्याने बळीराजाची चिंता वाढली! पालघरमध्ये पेरण्या खोळंबल्या, फक्त 6.27 टक्केच क्षेत्रावर पेरणी

पालघर जिल्हा विविध भागात विभागलेला असून डोंगरी नागरी आणि सागरी विभागात पसरलेल्या या जिल्ह्यात पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेतकरी आहेत. नेहमी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस हजेरी लावतो. मात्र, यंदा जूनचा तिसरा आठवडा उलटून देखील वरूण राजाने दडी मारली आहे. पालघर जिल्ह्यातील भातशेतीचे सरासरी पेरणी क्षेत्र 7664.42 हेक्टर असून यापैकी फक्त 473.13 हेक्टर क्षेत्रात अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. या आठवड्यापर्यंत फक्त 6.17 टक्के पेरणी पालघर जिल्ह्यात झाली आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत 1400 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला बराच उशीर झाल्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

जिल्ह्यात 73 हजार क्षेत्र लागवडीखाली आहे. भात पेरणी करताना दहा गुंठ्यामध्ये भाताची रोपे तयार केले जातात. ती तयार झाली की मग त्याच आवणि करून संपूर्ण शेतात ठराविक अंतरावर त्याची आवणी करून शेतातील शंभर टक्के क्षेत्र वापरले जाते 7664.42 हेक्टर क्षेत्र पेरण्याच्या खालचे आहे. त्यापैकी 473.13 हेक्टर क्षेत्रावर अजून पर्यंत पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बोअरवेल असल्यामुळे त्यांनी आपली कामे पूर्ण केली आहे मात्र जिल्ह्यातील बरेच शेतकरी विहिरी बोअरवेल नसल्यामुळे ते पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असतात. पावसाने पाठ फिरवल्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अजून पाऊस लांबला तर पेरणी कशी होणार ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पालघर जिल्ह्यात तीन प्रकारच्या पद्धतीने भाताची लागवड करण्यात येते हळव, गरव आणि निमगरव पद्धतीची लागवड होते. हळव हे 90 ते 110 दिवसाचे असते. वरकर जमीन भुसभुशीत जमीन इथे या प्रकारच्या भाताची लागवड होते. गरव भात पाणथळ जागी होतो तिथे पाणी साठवण असेल अशा ठिकाणी हे भात तयार होतो. ह्या भातास तयार होण्यासाठी 135 ते 140 दिवसाचा कालावधी लागतो. तर निम गरवचा कालावधी हा 115 ते 125 दिवसाचा असतो. हा प्रकार किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये प्रामुख्याने होत असतो.

ज्या ठिकाणी 80 टक्क्यापेक्षा जास्त ओलावा आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती करून ठेवतात. मात्र, यावर्षी पावसाने उशीर केल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागती केलेल्या नाहीत. ज्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी नांगरणीस सुरुवात करण्यात आली असून काहीजण नांगराने, तर काहीजण ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याचे दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी त्याचे क्षेत्र हे फक्त 473 हेक्टर असल्याने लांबलेला पाऊस शेतकऱ्यांना रडवतो की काय अशी स्थिती सध्या दिसत आहे.

तालुका सरासरी पेरणी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र टक्केवारी

पालघर 1532.85. 124.05. 8.12
वसई 789.12. 36.25. 4.59
डहाणू 1385.81. 22.44. 1.62
तलासरी 938.72. 4.35. 1.53
वाडा 1441.17. 24.00. 1.67
विक्रमगड 716.47. 143.20. 19.99
जव्हार. 658.70. 38.29 5.81
मोखाडा 201.58. 70.10. 34.78

Related Articles

Back to top button