देश

लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी; बॅंक खात्यात ५ हजार, सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या

लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही मातृत्वाचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत. अशाच एका प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल आपण जाणून घेऊया.

केंद्र सरकारकडून देशातील महिलांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येत आहेत. गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये या योजनेची माहिती दिली जाते. तरीही अनेक महिलांना या योजनेबद्दल माहिती नाही. यामध्ये सरकारकडून गरोदर महिलेला ५ हजार रुपये दिले जातात. १ जानेवारी २०१७ पासून ही योजना सुरु आहे.

देशभरात जन्माला येणारी मुले कुपोषित राहू नयेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत, हे लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या शासकीय योजनेअंतर्गत गरोदर महिलांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

योजनेचे वैशिष्ट्य
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय किमान 19 वर्षे असणे आवश्यक आहे. यासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातात. ५ हजारची पूर्ण रक्कम एकाच वेळी मिळत नाही. ३ हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते.

पैसे कसे मिळतात?
लाभार्थी महिलेला योजनेचे पैसे तीन हप्त्यात मिळतात. पहिला हप्ता रु 1000, दुसरा हप्ता रु 2000 आणि तिसरा हप्ता 2000 रुपयांचा मिळतो. हे पैसे हातात न देता थेट गर्भवती महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

हा लाभ मिळविण्यासाठी महिलेला अधिकृत वेबसाइट https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana वर सविस्तर माहिती मिळू शकेल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button