कोरोना (coronavirus) विषाणूने पुन्हा एकदा कहर करायला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत यासंबंधीच्या सर्व प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी कोरोनाच्या (coronavirus) विळख्याने बऱ्याच लोकांना जखडले आहे. यामध्ये सामान्य नागरिक ते राजकीय नेते आणि खेळाडू ते बॉलीवूडचे सेलिब्रीटी या क्षेत्रातील बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली होती. त्यातच आता कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येत असून बॉलिवूड अभिनेत्री आणि संसदेच्या सदस्य किरण खेर (Kirron Kher Covid Positive) यांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
किरण खेर यांनी ट्विट केले की, मी कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील तर त्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी.. तसेच 2021 मध्ये किरण खेर (Kirron Kher) यांना मल्टिपल मायलोमा (ब्लड कॅन्सरचा प्रकार) चे निदान झाले होते. याचा खुलास त्यांचे पती अनुपम खेर (Anupam kher) यांनी सोशल मीडियातून केला होता. त्यामुळे एक वर्ष राहिल्यानंतर उपचार पार पडल्यानंतर त्यांनी इंडियाज गॉट टॅलेट या रिअॅलिटी शो मधून जजच्या म्हणून दिसल्या…किरण खेर यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली. त्यातही देवदास, रंग दे बसंती, हम तुम, दोस्ताना, मैं हूं ना यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी सार्वधिक लोकप्रियता मिळवली.
कोरोनाचा कहर
राज्यात आठ दिवसांपूर्वी साधारण 50 ते 100 कोरोनाच्या नवीन रुग्णांचं निदान होत होतं. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2023 पर्यंत राज्यात 577 अॅक्टिव्ह रुग्ण होते. आता हीच रुग्णसंख्या 1309 वर पोहोचली आहे. तर 12 मार्च रोजी राज्यात 101 नवीन रुग्णांची नोंद झाली होती तर 13 मार्च रोजी 61 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. परंतु आठवड्याभरात ही रुग्णसंख्या वाढली आणि 19 मार्च रोजी 24 तासात 236 नवीन रुग्ण आढळले. यात रुग्णालयात दाखल व्हावं राहणाऱ्याा रुग्णांची संख्या कमी असून मृत्यूदर 1.82% एवढा आहे. तर नोव्हेंबर 2022 नंतर 13 मार्चला पहिल्यांदाच 24 तासांत 100 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर रुग्णसंख्या वाढत गेल्याचं दिसतं.
