देश

Kalicharan Maharaj: शिर्डीच्या साईबाबांना मुस्लीम ठरवण्याचं कट आखला जातोय; कालीचरण महाराज यांचा आरोप

कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिर्डीच्या साईबाबांवरून नवा वाद सुरू झाला आहे. शिर्डीच्या साईबाबांना मुस्लीम ठरवण्याचं कट आखला जात असल्याचा आरोप कालीचरण महाराज यांनी केला आहे.

शिर्डीचे साईबाबा हे जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रद्धा आणि सबुरी असा गुरुमंत्र देणाऱ्या साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. सबका मालिक एक असा एकात्मतेचा संदेश देणारे साईबाबा. मात्र, साईबाबांच्या नावावरून आता धर्माचं राजकारण सुरू झाले आहे. साईबाबांना मुस्लीम ठरवण्याचं षडयंत्र सुरू झाल्याचा आरोप कालीचरण महाराजांनी केला आहे. हिंदूंचं धर्मांतर करण्याचा हा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला. यवतमाळमध्ये हिंदू जनगर्जना सभेत कालीचरण महाराज यांनी हा आरोप केला. एवढंच नव्हे तर शिर्डीचं साई संस्थान आणि तमाम साईमंदिरांची संपत्ती हडप करण्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

शिर्डीचे साईबाबा हे महान संत होते. मात्र, त्यांना मुस्लिम घोषित करण्याचा प्रयत्न हा महामुर्खपणा असल्याचे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. देशात लव्ह जिहाद सोबतच लँड जिहाद, बदनामी जिहाद, यूपीएससी जिहाद व लोकसंख्या जिहाद फोफावत असल्याचा आरोप कालीचरण महाराज यांनी यावेळी केला.

साईबाबांचा जन्म कुठं आणि कधी झाला, हे कुणालाच माहित नाही
साईबाबांचा जन्म कुठं आणि कधी झाला, हे कुणालाच माहित नाही. त्यांचे आईवडील कोण होते, याबाबतही ठोस पुरावे नाहीत. चाँद पाटील नावाच्या मुस्लीम व्यापा-यानं त्यांना आश्रय दिला. चाँद पाटलांच्या नातेवाईकांच्या वरातीसोबत ते शिर्डीत आले आणि तिथंच खंडोबा मंदिरासमोर म्हाळसापतींनी त्यांना साई म्हणून साद घातली. तेव्हापासून ते साईबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. दरम्यान, साईबाबांना धर्माच्या राजकारणात अडकवणं चुकीचं असल्याचं शिर्डीवासियांचं म्हणणं आहे.

साईबाबा आयुष्यभर फकिराचं जीवन जगले
साईबाबा आयुष्यभर फकिराचं जीवन जगले. त्यांच्यावर जगभरातील भाविकांची अपार श्रद्धा आहे. करोडो रुपयांचं दान दरवर्षी हे भाविक साईचरणी अपर्ण करतात. त्यातून अनेक समाजोपयोगी कामं होतात. त्यामुळं साईबाबा हिंदू होते की मुस्लीम, यापेक्षाही त्यांनी काय शिकवण दिली, हे अधिक महत्त्वाचं आहे.

Related Articles

Back to top button