कौटुंबिक वाद सुरु असतानाच Nawazuddin Siddiqui नं घेतली राज ठाकरेंची भेट, ‘शिवतीर्थ’वर नेमकी काय चर्चा?
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरच्यांचे आणि पत्नीमध्ये मतभेद सुरु आहेत. मात्र, या सगळ्या प्रकरणावर नवाजुद्दीनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी देखील त्याचे चाहते सोशल मीडियावर तो काहीतरी पोस्ट शेअर करत या प्रकरणावर भाष्य करेल अशी अपेक्षा करत होते. मात्र, नवाजुद्दीनं आता एक वेगळीच पोस्ट शेअर केली आहे. नवाजुद्दीनं मराठी दिनानिमित्तानं ही पोस्ट शेअर केली आहे. तर त्याच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. इतकंच काय तर त्यानं शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
नवाजुद्दीननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नवाजुद्दीननं हा मराठी दिनानिमित्तानं शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये नवाजुद्दीन म्हणाला की ‘मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे ! मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच! सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !! लवकरच अभिजित पानसे यांच्यासोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे.’ नवाजुद्दीननं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
खरंतर नवाजुद्दीननं त्याच्या आगामी मराठी भाषेच्या प्रोजेक्टची अशी घोषणा केली आहे. तर अभिजित पानसे (Abhijit Panse) यांनी रानबाजर या गाजलेल्या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले होते. दरम्यान, नवाजुद्दीनं शेअर केलेल्या या ट्वीटला अभिजित पानसे यांनी देखील रीट्वीट केले आहे. नवाझुद्दीननं आज अभिजीत पानसेंसोबत मनसे अध्यक्ष राज ठातरेंची (Raj Thackeray) भेट घेतली. आता त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. नवाजुद्दीन आणि राज ठाकरे यांची भेट कोणत्या कारणासाठी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता अनेकांचे म्हणणे आहे की त्या दोघांची भेट ही आगामी प्रोजेक्टसाठी झाली तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की नवाजुद्दीन हा त्याच्या खासगी आयुष्यात सुरु असलेल्या प्रकरणासाठी राज ठाकरेंना भेटायला गेला होता.