देश

MP Net worth : खासदारांची संपत्ती कोट्यावधींनी वाढली… BJP पहिल्या स्थानी, सुप्रिया सुळेंचाही समावेश

संसदेत (Parliament) आपलं राज्य, जनता आणि मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदरांच्या संपत्तीची (MP Property) आकडेवारी समोर आली आहे. 2009 आणि 2019 दरम्यान लोकसभा निवडणुकीत आपली विजयी पताका कायम ठेवणाऱ्या खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार, या 71 खासदारांच्या संपत्तीत 286 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानुसार, 2009 मध्ये या 71 खासदारांची सरासरी संपत्ती 6.15 कोटी होती, जी 2014 मध्ये 16.23 कोटी रुपये इतकी झाली. त्यानंतर 5 वर्षांनी हा आकडा 17.59 कोटी रुपयांनी वाढून 23.75 कोटी रुपये झाली.

संपत्ती वाढलेल्या खासदारांच्या यादीत भाजपा (BJP) पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपाच्या एकूण 43 खासदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. भाजपा खासदारांची संपत्ती सरासरी 15 कोटींनी वाढली आहे. याशिवाय यादीत काँग्रेसचे 10 (Congress), तृणमूल काँग्रेसचे 7 (TMC), बीजू जनता दलाचे 2 (Biju Janta Dal) आणि शिवसेनेचे 2 (Shivsena) खासदार आहेत. याशिवाय संयुक्त जनता दल (Samyukat Janta Dal), एमआयएम (MIM), एआयईयूडीएफ, आययूएमएल, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal) आणि नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) या पक्षांच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल पहिल्या स्थानी
सर्वाधिक संपत्ती वाढ झालेल्या खासदारांच्या यादीत अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) पहिल्या स्थानी आहेत. त्यांच्या संपत्तीत तब्बल 157 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा 60.31 कोटींवरून 217.99 कोटी झाली आहे.

सुप्रिया सुळे दुसऱ्या क्रमांकावर
यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 89 कोटी 35 लाखांची वाढ झाली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळेंची संपत्ती 51.33 कोटी होती. 2019 मध्ये संपत्तीचा आकडा 140 कोटी 88 लाखांवर पोहोचला आहे.

भाजपा खासदार पिनाकी मिश्रा (BJP Pinaki Mishra) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 10 वर्षात त्यांची संपत्ती 87.78 कोटीनी वाढली आहे. 2009 मध्ये त्यांच्याकडे 29.69 कोटींची संपत्ती होती, 2019 मध्ये हा आकडा 117 कोटी 47 लाखांवर पोहोचला आहे.

दरम्यान भाजपामधील गांधी आई आणि पुत्रही हा यादीत आहेत. वरुण गांधींचा (Varun Gandhi) 2009 मधील संपत्तीचा आकडा 4.92 कोटींवरुन 2019 मध्ये 60.32 कोटींवर पोहोचला आहे. तर मनेका गांधी (Maneka Gandhi) यांची संपत्ती 2009 मध्ये 17 कोटी रुपये होती. ती 2019 मध्ये 55 कोटी रुपये झाली आहे.

Related Articles

Back to top button