Sanjay Raut :संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ED च्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल 102 दिवसांनंतर न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं (ED) हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज (शुक्रवारी) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl land scam ) संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं तातडीनं पावलं उचलली होती. राऊतांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली ज्यावर आज काय निर्णय येणार याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे.
जामिन मिळताच ईडीकडून स्थगितीची मागणी (ED demands stay on sanjay rauts bail)
संजय राऊत यांना सदरील प्रकरणी न्यायालयाकडून 2 लाख रुपयांच्या रोख रमकेमवर जामीन मंजूर झाला. पण, त्याला स्थगितीची मागणी ईडीकडून लागलीच करण्यात आली. जामिनाला स्थगिती देण्याची ईडीने (ED) पीएमएलए कोर्टाकडे मागणी केली होती. ही मागणी फेटाळल्याने संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला. ज्यानंतर ईडीनं हायकोर्टात धाव घेतली.
संजय राऊत यांच्या जामिनावर सुनावणीच्या वेळी पीएमएलए कोर्टानं ईडीला खडे बोल सुनावलं होतं. पत्राचाळ प्रकरणामध्ये आरोपींना केलेली अटक बेकायदेशीर असत मनी लॉन्ड्रींग आणि आर्थिक गुन्ह्यांच्या नावाखाली दोषी नसलेल्यांना अटक करणं कोर्टाला मान्य नसल्याची बाब त्यावेळी अधोरेखित करण्यात आली होती.
पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं आहे काय? (What is Patra chawl scam?)
– हा तब्बल 1034 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा आहे.
– गोरेगाव पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड असून या चाळीच्या विकासाचं काम प्रवीण राऊतांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हाती सोपवण्यात आलं होतं.
– असं असूनही काही खासगी बिल्डरना यातील भूखंड विकला गेल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
– प्रवीण राऊतांवर (Pravin raut) चाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
– प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं कळतं, PMC घोटाळ्यातही त्यांचं नाव समोर आलं होतं.
– प्रवीण राऊत यांच्या पत्नीत्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपयांची देवाणघेवाण पाहायला मिळाली होती.
– एकंदरच प्रवीण राऊतांशी असणाऱे व्यवहार आणि तत्सम देवाणघेवाणीचे प्रकार दिसून आल्यामुळं या प्रकरणार संजय राऊत यांचं नाव गोवलं गेलं होतं.