देश

Andheri Bye Election : अंधेरी पोटनिवडणूक एकत्र लढण्यावर महाविकास आघाडीचं एकमत नाही?

अंधेरी पूर्व विधासनभा पोटनिवडणुकीबाबत (Andheri Bye Election) मोठी माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीत या पोटनिवडणुकीत एकत्र लढवण्याबाबत (Mahavikas Aghadi) एकमत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत आघाडीबाबत एकमत झालेलं नाही. शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रस्तावाचा काँग्रेसला (Congress) विसर पडल्याचं दिसतंय. त्यामुळे या पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी झालीय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (mahavikas aghadi has no consensus on contest andheri east assembly constituency by elections 2022 rutuja latke murji patel)

आमदार रमेश लटके (Ramesh Latke Death) यांचं 12 मे ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. तेव्हापासून ही जागा रिकामी आहे. आमदार लटकेंच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही जागा शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचं मविआ म्हणून एकत्र लढायचं का, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. किंबहुना याबाबत अजून तरी एकमत झालेलं नाही, असं सूत्रांनी सांगितलंय.

शिवसेनेनं पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसला एक प्रस्तावही पाठवला होता. मात्र त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिलीय. त्यामुळे आता हा प्रश्न चिघळल्याची माहिती आहे.

इतकंच नाही, तर शिवसेना नेते आणि विभागप्रमुख अनिल परब (Anil Parab) यांच्यासह इतर काही मंडळींनी या संदर्भात काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडे संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मात्र अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता ही निवडणूक तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढवणार की शिवसेना एकटीच लढणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लटकेंसमोर भाजपचं आव्हान
भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पटेल हे माजी नगरसवेक राहिले आहेत. पटेल यांची मतदारसंघात घट्ट पकड आहे. पटेल यांनी 2019 मध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र रमेश लटके यांनी पटेल यांचा 10 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की पटेल यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं होती.

भाजपची जोरदार फिल्डींग
मुंबईत अवघ्या काही दिवसांवर पालिका निवडणूक येऊन ठेपली आहे. त्याआधी भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थिती ही पोटनिवडणूक जिंकायचीच, असा भाजपचा निर्धार आहे. या पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी ही भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मतदार कुणाला विजयी करणार, याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

Related Articles

Back to top button