Cheetah Is Back : 70 वर्षांनंतर भारतात पुन्हा चित्ते, विशेष विमानाने 8 चित्ते दाखल
cheetah Back in India : आफ्रिकन देश नामिबिया. (Namibia) याच देशातून आठ विदेशी चित्ते तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पोहोचले आहेत. (cheetah in india) एक विशेष विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले आहे. येथून हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे.
परदेशी चित्ते श्योपूरला पोहोचले
नामिबियाचे चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथे पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर चित्तांसह ग्वाल्हेरहून श्योपूरला पोहोचले आहे. काही वेळाने पंतप्रधान मोदी त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडतील. 70 वर्षांनंतर भारतात पुन्हा चित्ते दाखल झाले आहेत.
नामिबियातून 8 चित्ते विशेष विमानाने भारतात
नामिबियातून 8 चित्ते विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. ग्वाल्हेरमधून चित्यांना हेलिकॉप्टरनं नेले आहे. चित्त्यांची कुनो नॅशनल पार्कामध्ये रवानगी करण्यात आली आहे. 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. तर 3 नर चित्यांमध्ये 2 सख्खे भाऊ आहेत.
तर चित्ता ब्रदर्सचं वय साडे पाच वर्ष आहे. तिसऱ्या नर चित्याचं वय साडे चार वर्ष आहे. तसेच 5 मादी चित्त्यांचं वय 2 वर्षे ते 5 वर्षांपर्यंत आहे. या चित्यांचं आयुष्य जास्तीत जास्त 12 वर्षे असते, अशी माहिती देण्यात आली आहे.
1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित केल्यानंतर सात दशकांनंतर भारतामध्ये त्यांच्या पुन: परिचयासाठी दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले जात आहेत. भारतातून नामशेष झालेली ही प्रजाती पुन्हा एकदा देशात आल्यामुळं सध्या सर्वत्र आणि विशेष म्हणजे प्राणीप्रेमींमध्ये कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे. नामिबियातून (Namibia) भारतात आलेल्या याच चित्त्यांची पहिली (Cheetah First look) झलक नुकतीच समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही दृश्य पाहता येत आहेत. यामध्ये चित्ते नजर रोखून पाहताना दिसत आहे.
चित्त्यांना आणण्यासाठी खास बोईंग विमानाची सोय करण्यात आली आहे. विंडहोक विमानतळावर हे विमानत उतरलं. मुख्य म्हणजे चित्त्यांसाठी या विमानात खास बदलही करण्यात आले. नामिबीयाहून आलेले हे पाहुणे यापुढे (Madhya Pradesh) मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत.