गणेशोत्सव मंडळाने 20 हजार पत्रावळीतून साकारला इंदापूरातील बहुचर्चीत महालाचा देखावा
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील मानाचा दुसरा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येत असतात. कासार पट्ट्यातील नामदेव मंदिरात श्री नरसिंह प्रासादिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली १०३ वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. यंदा हे मंडळ अधिक चर्चेत आलयं. कारण या ठिकाणी पत्रावळीतून महाल साकारण्यात आला आहे. यासाठी तब्बल 20 हजार पत्रावळींचा वापर करण्यात आला आहे.
वीस हजारहून अधिक पत्रावळीतून हा पर्यावरण पूरक महाल साकारण्यासाठी जवळपास पंधरा दिवस लागले. मंडळाच्या सदस्यांनी मिळेल त्या वेळेत अहोरात्र कष्ट घेऊन हा महाल साकारला. यासाठी अंदाजे पंचवीस हजार रुपये खर्च आलाय.
इंदापूर शहरात प्रथमच पत्रावळ्या द्रोणचा वापर करत मंदिरात सजावट करण्यात आली आहे. हा देखावा पाहण्यासाठी शहरातील नागरिक गर्दी करत आहेत. या मंडळाच्या वतीने नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळाने थेट पत्रावळीतून साकरलेली ही कलाकृती अवघ्या इंदापूरवासीयांना भूरळ घालते आहे.