देश

दादरमधील प्रसिद्ध सुविधा शो रूमच्या मालकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

दादरमधील प्रसिद्ध सुविधा या शो रुमच्या मालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गशेजारील एका वाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. कल्पेश मारू यांचा मृतदेह विरार हद्दीत सापडला असून मांडवी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कल्पेश मारू यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आत्महत्येमागचं कारण अजून पुढे आलेलं नाही.

कल्पेश मारू यांचा मृतदेह विरार हद्दीतील शिरसाड येथे सापडला आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी हा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता, शिवाय मृतदेहासोबत कोणतीही सुसाईडनोट पोलिसांना सापडली नसल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास आता मांडवी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कल्पेश मारू हे बऱ्याच दिवसांपासून आजारपणाला कंटाळले होते. त्यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे का याचाही पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button