देश

कळवा कारशेडची एसी लोकल प्रवाशांनी रोखली; कारशेडमधून प्रवासाचा मार्ग बंद झाल्याने असंतोष, पोलिसांकडून लाठीचार्ज

मध्य रेल्वेच्या लोकल गर्दीला त्रस्त रेल्वे प्रवासी गेल्या काही वर्षांपासून कळवा कारशेडमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढून प्रवास करतात. परंतु कारशेडमधून सुटणारी ही लोकल आजपासून एसीमध्ये रूपांतरीत झाल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. कारशेडमधून सुटणाऱ्या या लोकलसमोर मोठ्यासंख्येने प्रवासी एकत्र येऊ प्रवाशांनी ही लोकल रोखून धरली. पोलीस आणि सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना ट्रेकवरुन बाजूला करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत काही प्रवाशांवर लाठीचार्ज केला, अशी माहिती स्थानिक प्रवाशांनी दिली.

नवीन ट्रॅक होऊनही मेल चालवल्या मुळे ट्रेन मध्ये प्रवास करायला मिळत नसल्यामुळे जीव धोक्यात टाकून कराशेड लोकल मधून प्रवासाचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांवर आज अन्याय कारक लाठी चार्ज करणाऱ्यात आल्याचे कळवा पारसिक प्रवासी संघटनेकडून सांगण्यात आले. अनेक वेळेला लोकशाही मार्गाने आंदोलने केली, अनेक वेळेला अधिकाऱ्यांना भेटून चर्चा केल्या. ५० च्या वर पत्र विविध अधिकारी आणि रेल्वे मंत्रालया ला देऊन सुद्धा अनेक वर्ष कळव्याच्या प्रवाशांवर अन्यायच होत आहे. त्यामुळे नाईलाजाने आज प्रवाशांकडून आंदोलनाचे पाऊल उचलले गेले असल्याचा प्रवाशांचे म्हणणे आहे.

असंतोषाचा कडेलोट
कळवा प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी ६ ऑगस्ट रोजी प्रवासी संघटनांकडून आंदोलन करण्याची घोषणा केली होती. परंतु २६ जुलै रोजी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगिती करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही कळव्यातील प्रवाशांना दिलासा देण्यात आला नसल्याने प्रवाशांच्या असंतोषाचा कडेलोट झाला.

आंदोलनाचे तत्कालीन कारण..
कळवा कारशेडमध्ये लोकलमधून गेली ४० वर्षांपासून प्रवासी प्रवास करतात. परंतु ही लोकल एसी झाल्यामुळे त्यांची दारे बंद असल्याने आज प्रवाशांचा कारशेड लोकलचा मार्ग बंद झाला. परिणामी प्रवासी आक्रमक झाल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.

कळवावासीयांच्या मागण्या..
पाचव्या-साठवता नवीन ट्रॅक होऊनही कळवा परिसरात १४७ मृत्यू झाले आहेत. कळवा कारशेड लोकलला होम प्लॅटफॉर्म बांधून ही लोकल कालव्यातून सोडावी. ५-६ नवीन ट्रॅक लोकलसाठी आरक्षित करून त्यावरून केवळ लोकल चालवणे आणि वाढवाव्यात. पारसिक बोगद्या मेल साठी उपलब्ध असूनही मेल एक्स्प्रेस कळवा ते दिवा नवीन ट्रॅक वरून चालवणे थांबवा. मेल एक्सप्रेसमुळे रोजच लोकल १०-२० मिनिटे उशिराने चालत आहेत.

Related Articles

Back to top button