देश

शिक्षकी पेशाला काळीमा! कबड्डी शिकवण्याच्या निमित्ताने शरिराच्या नको त्या भागाला स्पर्श

कबड्डीपटूचा विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला नागपुरातल्या जुनी कामठी पोलिसांनी अटक केली आहे. जयप्रकाश मेथिया असे आरोपी प्रशिक्षकाचे नाव आहे. प्रशिक्षकाच्या या कृत्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, जुनी कामठी परिसरात राहणारी 16 वर्षीय प्रशिक्षणार्थी ही कबड्डी खेळाडू आहे. कबड्डीत मोठी झेप घेण्याच्या उद्देशाने ती नियमीत सरावला जात असे. आरोपी जयप्रकाश मेथिया हा तिचा कोच आहे. मे ते 6 ऑगस्ट 2022 दरम्यान कोच जयप्रकाश हा कबड्डीचा क्लास सुटल्यावर फिर्यादी प्रशिक्षणार्थीला उंची वाढविण्याकरिता मालिश करावी लागते, असे सांगून तिला थांबवत होता. त्यानंतर तिची तो मालिश करून द्यायचा.

दरम्यान, जयप्रकाशने तिला 2 ते 3 वेळा रामटेक येथे फिरायला नेले होते. यावेळी तिला गाडी चालवायला लावून स्वत: मागे बसत आहे.

गाडी चालवताना तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे करीत विनयभंग करीत होता. कोचचा वाईट हेतू लक्षात येताच फिर्यादीने जुनी कामठी गाठत पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली. आरोपीविरुद्ध कलम 354 भादंवि सहकलम 8,12 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर आरोपीला त्याला अटक केली आहे. कबड्डीपटूसोबत प्रशिक्षकाच्या या कृत्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. खेळाडूंना घडविण्याऐवजी प्रशिक्षकाचे नसते कृत्य काळिमा फासणारे आहे..

Related Articles

Back to top button