Search
Close this search box.

“…तर आम्ही भाजपावाले आणि देवेंद्र फडणवीस”, किचन कल्लाकारमध्ये रामदास आठवलेंनी दिला अजित पवारांना सल्ला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘किचन कल्लाकार’ कडे पाहिलं जातं. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकार, नेते मंडळी सहभागी झाले आहेत. ‘किचन कल्लाकार’च्या येत्या भागात आपल्या मिश्किल कवितांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले सहभागी होणार आहेत. यावेळी रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक सल्ला दिला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रामदास आठवलेंना अजित पवार यांचा फोटो दाखवला जातो. हा फोटो पाहून आठवले लगेच कविता ऐकवतात. “जे करतात अनेक वेळेला वादा…अन् पुरा करत नाहीत ते आहेत अजित दादा…”, अशा शब्दांत ते अजित दादांची ओळख करून देतात. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न केल्यावर आठवले म्हणतात, “त्यांना सल्ला आमचा एवढाच आहे की, शिवसेनेला दिलेला पाठींबा त्यांनी ताबडतोब काढावा…त्यांनी पाठींबा काढला की आम्ही भाजपावाले, देवेंद्र फडणवीस…आम्ही तर तयारच बसलो आहोत…”

झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’ हा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, शुभा खोटे, संजय मोने, संजय नार्वेकर अशा अनेक मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच अनेक राजकीय मंडळींना सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. यात पंकजा मुंडे, चित्र वाघ, किशोरी पेडणेकर, रुपाली ठोंबरे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अशा अनेकांनी सहभाग घेतला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें