Search
Close this search box.

Aaditya Thackeray : अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा मागणार – आदित्य ठाकरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. आदित्य ठाकरे यांनी यावेळी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली.  मी चौथ्यांदा इथं येत आहे. राम मंदिर बनतंय. त्यामुळे उत्साह व जल्लोष आहे. आम्ही पहले मंदिर, फिर सरकारची घोषणा दिली होती. आता मंदिर बनतंय. राजकारण करायला नव्हे तर दर्शन घ्यायला आलोय. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्या ठाकरे यांनी म्हटलं की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलणार आहेत. या अयोध्येत ते महाराष्ट्र सदनसाठी जागा मागणार आहेत. 100 खोल्यांचे भवन येथे बनवायचं आहे.’

‘अयोध्या पवित्र भूमी आहे. शिवसेना कुटुंब येथे आलं आहे. हजारोच्या संख्येने आले आहेत. देशाची सेवा, लोकांची सेवा करायची आहे. इस्कॉन येथे देखील गेलो. प्रसाद घेतला. त्यांनी बोलवलं होतं.’

‘शिवसेनेचं राजकारण आणि हिंदुत्व सर्वांना माहित आहे. आम्ही दिलेलं वचन पूर्ण करतो. येथे राजकारणासाठी नाही तर आस्था आहे म्हणून आलो आहे. आम्ही येथे दर्शनासाठी आलोय. चांगल्या कामासाठी दर्शन घेतोय. कोर्टाच्या निर्णयानंतर मंदिर बनतंय. याचा आनंद आहे. ‘

‘कोविड काळात देशातील सर्व लोकांना राज्यात प्राधान्य दिलं. त्यामुळे आमचं इथं स्वागत झालं. मी इतर कोणत्या पक्षाबद्दल बोलणार नाही.’

‘केंद्रीय यंत्रणा प्रचार साहित्य बनले आहेत. ते मी मुंबईत देखील म्हटलं आहे. येथे प्रत्येक हृदयात शिवसेना आहे.’ असं ही आदित्य़ ठाकरे यांनी म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें